[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका युवासेना आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उत्साही सहभाग

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका युवासेना आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उत्साही सहभाग

रक्तदान करते वेळी कार्यकर्ते

चांदवड ( प्रतिनिधी ) :- चांदवड तालुका युवासेना यांच्या वतीने , चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून शिवसेना पक्षप्रमुख व मानानिय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व युवासेना राज्य सहसचिव दिंडोरी लोकसभा युवा सेना संपर्क प्रमुख श्री निलेशजी गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली युवासेना जिल्हा अधिकारी नाशिक ग्रामीण श्री सुजीत मोरे युवासेना जिल्हा चिटणीस श्री भुषन मुळाने मा.तालुकाप्रमुख श्री शांताराम ठाकरे व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक भारतीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात कोवीड १९ या रोगाच्या प्रादुर्भावा मुळे रक्तसाठा दोन तीन दिवस पुरेल इतकाच असुन राज्याला रक्ताची गरज आहे तरी रक्त दात्यांनी पुढे येउन रक्तदान करावे असे आवाहान मा.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे यांनी केले त्या आवाहानाला प्रतीसाद देत दिंडोरी लोकसभा युवासेना संपर्क प्रमुख श्री निलेशजी गवळी व नाशिक जिल्हा युवासेना पदाधिकारी यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघात विवीध ठीकाणी रक्तदान शिबिर आयोजीत करण्याचे निर्दश दिले .


त्या आवाहानाला प्रतीसाद देत चांदवड तालुका युवासेनाधिकारी श्री रोहीत ठाकरे श्री अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली चांदवड तालुक्यातील युवासेना पदाधिकारी दुगाव गणप्रमुख शंकर जोंधळे शाखाप्रमुख माणिक ठाकरे यांनी पाथरशेंबे येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले रक्तदान शिबीरात चांदवड तालुक्यातील युवकांनी उत्साही प्रतीसाद देत 35 रक्त पिशव्यांचे संकलन व रक्तदान केले.कार्यक्रमास युवासेना सहसचिव श्री निलेश गवळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे, महिलाआघाडी जिल्हा संघटक सौ.भारतीताई जाधव युवासेना जिल्हा चिटणीस भुषन मुळाने माजी तालुका प्रमुख श्री शांताराम ठाकरे संगम देशमुख महेश गोडसे तळेगाव रोही गट संघटक श्री उत्तम मापारी गोरख अहिरे समाधान गुंजाळ अशोक आहेर शंकर जोंधळे माणिक ठाकरे समाधान शेळके गोरख जोंधळे सागर सवंदरे सिद्धार्थ साबळे ऋषिकेश वाघ माऊली ठोंबरे महिला आघाडी चांदवड शहरप्रमुख रोहिणी ताई वाघ चांदवड तालुका महीला आघाडी समन्वयक सविता ताई काळे पुष्पाताई भवर हिराताई सोनवणे मीनाताई शिरसाठ राजू ठाकरे नागेश ठाकरे बाळासाहेब आहेर पप्पू शिंदे नाना गुंजाळ माणीक ठाकरे विकास साठे पप्पु महाले योगेश साठे आमोल महाले माणिक शिंदे बिपीन घोलप भैया सिरसाठ समाधान माळी काळु जोंधळे ज्ञानेश्वर महाले सह शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक महीलाआघाडी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या