[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

तालुक्यात 138 सदस्य बिनविरोध 725 उमेदवार निवडणूक लढविणार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

अनेक उमेदवार आपल्या , प्रतिस्पर्धी उमेद्वारांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते. तर पॅनल प्रमुख आपल्या पॅनल मधील अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या समर्थकांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते.

चांदवड तालुक्यात दिघवद ग्रामपंचायत बिनविरोध

तालुक्यात 138 सदस्य बिनविरोध 725 उमेदवार निवडणूक लढविणार

चांदवड ( विक्रम देवरे ) : चांदवड तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीचा निवडणुकांमध्ये सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तालुक्यातील दिघवद ही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे. माघारीच्या दिवशी चांदवड तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. अनेक उमेदवार आपल्या , प्रतिस्पर्धी उमेद्वारांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते. तर पॅनल प्रमुख आपल्या पॅनल मधील अतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या समर्थकांना माघार घेण्यासाठी विनवणी करताना दिसत होते.

चांदवड तालुक्‍यातील दिघवद वगळता अन्य बावन्न ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. काही ग्रामपंचायतीत बहुतांश सदस्य हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर काही ठिकाणी प्रभागांमध्ये मात्र निवडणुका लागल्या आहेत. चांदवड तालुक्यात एकूण 172 प्रभाग असून त्यातून 479 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. माघारीनंतर सध्या निवडणूक रिंगणात 725 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर 138 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. 246 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 9 जागा या रिक्त राहिल्या आहेत त्यामुळे 725 उमेदवार आता 479 जागांसाठी नशीब आजमावणार आहेत.

चांदवड तालुक्यातील पुढील गावांमध्ये निवडणुका होत आहेत.

आसरखेडे, अहिरखेडे, बहादुरी, बोपाणे, भडाणे, भयाळे, भोयेगाव, दह्याणे, धोडांबे, धोंडगव्हाण, डोंगरगांव, गंगावे, गोहरण, हरणुल, हट्टी, हिरापुर, हिवरखेडे, काळखोडे, कानमंडाळे, कातरवाडी, कळमदरे, जोपुळ, कानडगांव, खडकजांब, न्हनावे, नांदुरटेक, निमगव्हाण, पन्हाळे , पारेगांव, परसुल, पाथरशेंबे, पिंपळद, पिंपळणारे, राहुड, राजदेरवाडी, रायपूर, सोग्रस, सुतारखेडे, शिरसाणे, शिंदे, शिरूर, शिवरे, तिसगांव, उर्धुळ, उसवाड, वडनेरभैरव, वडबारे, वडगांव पंगु, वागर्दडी, वाहेगावसाळ, वाकी बु, वाकी खुर्द, या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील. तर दिघवद येथे मात्र बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या