वृक्ष संवर्धन करणारी,बाल मनात हिरवळीचे बी रुजवणारी, निसर्गाशी नात घट्ट करून मूल्यशिक्षण देणारी
‘पर्यावरण पूरक शाडूमाती पासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा’ नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता.चांदवड.जि.नाशिक. शाळेत संपन्न.

कलाकृतीची माहिती व प्रशिक्षण देताना कलाशिक्षक देव हिरे
गणेश उत्सवासोबत वृक्षारोपण करणे व पाणीप्रदूषण टाळून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे या संकल्पनेने दर वर्षा प्रमाणे या वर्षीही शाडूमाती पासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यात आले. या कार्यशाळेत ५० विद्यार्थी सहभागी झाले.

मूर्ती बनवण्यासोबत मूर्तीत झाडांच्या बिया टाकण्यात आल्या
मूर्ती बनवण्यासोबत मूर्तीत झाडांच्या बिया टाकण्यात आल्या. विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरी एका कुंडीत करून त्यात भरपूर ऑक्सिजन देणारे तुळशीचे रोप सुद्धा लावतील. जेणे करून वृक्षारोपण, वृक्ष संगोपन व पाणी प्रदूषण टाळण्यास मदत होईल.
या संकल्पनेतून दि.९ सप्टेंबर २०२१. रोजी ही कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे मार्गदर्शन कलाशिक्षक श्री.देविदास हिरे सर यांनी केले. तसेच शाळेचे मा.पर्यवेक्षक श्री.कृ.बा.लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित केले. शाळेचे सर्व शिक्षक ,कर्मचारी वृंद यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. प्रथम आठ क्रमांक निवडण्यासाठी श्री.कृ.बा.लोखंडे सर,श्री,प्र.क.सावंत सर, श्री.सचिन पाटील सर,श्री.शि.र.जाधव सर, यांनी मूर्ती परीक्षण केले.

शाडू मातीची गणेश मूर्ती दाखवताना कलाशिक्षक देव हिरे


