मनमाड : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी व मनमाड शहराचे भूमिपुत्र प्रा. नितीनजी लालसरे यांचा मनमाड येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसेच नेहरू रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी त्यांनी मनमाड येथील महाराष्ट्र वडापाव सेंटरला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार पत्रकार सतिषसिंह परदेशी, मनमाडचे माजी नगराध्यक्ष भिमराव जेजुरे, पत्रकार विक्रम देवरे, सामाजिक कार्यकर्ते शुभम गायकवाड, अशोक व्यवहारे आदींनी केला.तसेच विविध विषयांवर चर्चा केली.तसेच शासकीय पातळीवर कामे असतील तर त्यासाठी मदत करण्यासाठी आश्वस्त केले

