मनमाड जवळील पांझन धोटाणे येथे नदीला पूर आल्याने दवाखान्यात रूग्णांला घेऊन जाणारी ॲम्बुलन्स अडकुन पडली.
नदीवर पूल बांधण्याची मागणी
नांदगाव/ राजेंद्र तळेकर
मनमाड जवळ असलेल्या पांझन धोटाणे येथे रुग्णाला रुग्णालयात हलवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी येथे एका रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्बुलन्स मागविण्यात आली मात्र पांझन घोटाणे येथील नदीला मोठा पूर आल्याने या फरशी वरून ऑम्बूलन्स जाऊ शकली नाही त्यामुळे रुग्ण त्या थडीला व ॲम्बुलन्स या बाजूला अशी अवस्था निर्माण झाली त्यामुळे या नदीवर पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नदीला जास्त पाणी असल्याने अशा संकटाच्या वेळी रुग्णांना न्यायच कसे असा प्रश्न तयार होत आहे

