[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महाडीबीटीपोर्टल वर कागदपत्रे सादर न केल्यास ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड होणार रदद्

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कृषि योजनांमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी लघु संदेश प्राप्त झाल्यानंतर शक्यतो २-३दिवसात कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत,तसेच लाभ घेण्यास इच्छुक नसेल तर कृषि विभागास कळवावे जेणेकरून प्रतीक्षा यादीमधील शेतकरी बांधवांना लाभ देणे सोईचे होईल.
-विलास सोनवणे,
तालुका कृषि अधिकारी,चांदवड

महाडीबीटीपोर्टल वर कागदपत्रे सादर न केल्यास ऑनलाइन सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड होणार रदद्

कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यात येत आहेत.सदर अर्जांची अनुदान उपलब्धतेनुसार ऑनलाइन सोडत होऊन निवड झालेल्या लाभार्थ्यांना लघु संदेशाद्वारे तसेच कृषी विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे. सोडतीत निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी त्वरीत आपली कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.

कृषि योजनांमध्ये सोडतीत निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी ३० दिवसांच्या आत कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे अपेक्षित आहे,कागदपत्रे अपलोड केल्यानंतर इनवॉइस अपलोड करावयाचे आहे.परंतु निवड झालेल्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी ३० दिवसांचा कालावधी उलटूनही आजतागायत आपली कागदपत्रे व इनवॉइस अपलोड केलेले नाही.त्यामुळे प्रतिक्षा यादीमधील शेतकरी बांधवांना लाभ देता येत नाही.तरी सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्रे व इनवॉइस विहित मुदतीत अपलोड करावेत अन्यथा आपण कृषी योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक नाही असे समजुन आपली निवड रद्द करण्यात येणार असल्याचे तालुका कृषि अधिकारी विलास सोनवणे यांनी सांगितले आहे.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या