[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी चांदवड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांचा सहभाग

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी चांदवड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांचा सहभाग


चांदवड तालुका महविकास आघाडी व घटक पक्षांची पुकारलेल्या चांदवड बंदला व्यापारी, शेतकरी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. चांदवड शहर तसेच तालुक्यात सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे निदर्शने करणार्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप नेत्यांनी गाड्या घातल्या त्यात शेतकऱ्यांसह आठ लोक मारले गेले या घटनेच्या निषेधार्थ 11आक्टोंबरला महाराष्ट्र बंद* पुकारला होता.
त्या संदर्भात सोमवारी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट,प्रहार,सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची हजेरी लावली. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. . यावेळी निवेदन देण्यात आले.
निवेदन असे
निवेदन चांदवड तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष , संघटना प्रति , मा . उपविभागीय अधिकारी सो , मा . तहसिलदार सो , चांदवड , मा . पोलीस निरीक्षक सो , चांदवड , विषय : आज दिनांक ११/१०/२०२१ रोजीच्या बंद बाबत .. महोदय , आम्ही चांदवड तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष , संघटना आपणास निवेदन देतो की , दिनांक ०३/१०/२०२१ रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्या विरोधात तेथील शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते , असे असतांना लखीमपुर येथील आशिष मिश्रा या केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाने स्वतःच्या मालकीचे वाहन स्वतः चालवून शेतकऱ्याच्या अंगावर घालुन ८ शेतकऱ्यांना त्या गाडीखाली खुन करुन हत्या केली . त्यात आठ शेतकरी मरण पावले . साधारण १५-२० शेतकरी गंभीररित्या जखमी झालेले आहे . मुळात दिनांक २६ / ० ९ / २०२१ रोजी यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी याच आंदोलकांना सुधारजाव वरणा सुधार देंगे असे म्हणून यापुर्वी धमकावले होते . तसेच आम्ही गाडी खाली उतरलो तर तुम्हाला पळतीभुई थोडी होईल अशी धमकी दिली होती . वास्तवीक लोकशाही देशात केंद्रीय गृहराज्यमंत्र्याला असे धमकीची भाषा करणारे विधान शोभत नाही . सदरच्या धमकीनुसार काही दिवसाच्या आत त्याच्या मुलाने हत्याकांड सदरचे घडवून आणले . आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो . आज चांदवड तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष , संघटना शेतकरी व व्यापारी बांधावांनी सोमवार बाजार असतांना देखील स्वयंस्फुर्तीने बंद ठेवला व केंद्र सरकारच्या हिटलर शाही घोरणाचा निषेध करण्यात आला . तरी आजच्या या महाराष्ट्र राज्याचा बंद मध्ये चांदवड तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष , संघटना यांनी पुकारलेला या बंदला अनुसरुन आम्ही खालील मागण्याचे निवेदन आपणास देत आहोत . : १ ) केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा त्वरीत राजीनामा घेवून त्यांना या गुन्हयात सह आरोपी करण्यात यावे . २ ) सदरचा खटला हा विशेष जलद न्यायालयात जलद गतीने सलग कामकाज चालविण्यात यावा . ३ ) केंद्र शासनाने मंजूर केलेले तिनही कृषि कायदे त्वरीत रद्द करावे व शेती मालाला आधारभुत किंमतीचा कायदा करण्यात यावा . या मागण्यांची दखल न घेतल्यास चांदवड तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्ष , संघटना यांचे तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी . असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिरीषकुमार कोतवाल ( माजी विधानसभा सदस्य , ) नितीन आहेर ( जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना ) श्री संजय जाधव ,( काँग्रेस तालुकाध्यक्ष),डॉ सयाजीराव गायकवाड(राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष) ,श्री विलास भवर (तालुका अध्यक्ष शिवसेना ) सुनिलतात्या कबाडे,( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ) , विजय जाधव ( सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस ) ,प्रकाश शेळके( शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस),अॅड दत्तात्रय गांगुर्डे . (तालुका अध्यक्ष भारतीय कम्युनिष्ट पक्ष), समाधान जामदार( काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष), दत्तात्रय वाघचौरे,( राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष),संदेश खैरे ( शभुराजे ), शिवसेना शहर शब्बीर सैय्यद (तालुका अध्यक्ष भारताचा मार्कसवादी कम्युनिष्ट पक्ष ) रिजवान घासी ,तुकाराम सोनवणे,
लक्ष्मण आहेर, काँ. छबुराव पुरकर, श्री शिवाजी कासव (सरचिटणीस नाशिक जिल्हा काँग्रेस) , . शैलेश ठाकरे, , विश्वनाथ गांगुर्डे , अँड. नवनाथ आहेर रौनक कबाडे, विक्रम जगताप , हरि निकम, संघाक बाळासाहेब कोतवाल, ऋषिकेश सोनवणे, मतीन घासी, श्री प्रकाश चव्हाण (तालुका अध्यक्ष प्रहार संघटना) . अनिले पाटील विजयनाना गांगूडै, (कार्याध्यक्ष रा.यू. कॉ . चाँदवड तालुका),गणेश निंबाळकर, उत्तमराव ठोंबरे ,रघुनाथ आहेर, यु.के.आहेर,बापू शिंदे,विकी जाधव,रमेश वाघचौरे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या