दसर्याच्या निमित्ताने चांदवडच्या बाजार समितीसाठी ईच्छुकांनी साधली पर्वणी

निवडणूकीसाठी ईच्छुक पँनलमध्ये वर्णी लागावी यासाठी लावताहेत फिल्डींग
चांदवड : – चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात होत आहे. या सोमवार पासून तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ व ग्रामपंचायतींचे सदस्य यांच्या याद्या मांगविण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणूकीसाठी ईच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच या ना त्या कारणाने मतदारांशीही संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी तालुक्यातील सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांना दसर्याच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी प्रत्यक्ष भेटुन तर काहींनी भ्रमणध्वनीवर, तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या. बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळातही अनेक जण पुन्हा उमेदवारी करण्यासाठी ईच्छुक आहेत. तर विविध पक्षांचे पदाधिकारी सुध्दा ईच्छुक आहेत. सध्या बाजार समितीचे सभापती असलेले डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी तर गतवर्षापासुनच पँनलमध्ये ईच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांना तयारीच्या सुचना दिल्या आहेत. मागील निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवित त्यांनी यश संपादन केले होते. भारतीय जनता पार्टी बरोबरच, शिवसेना व विविध पक्षांची मोट बांधून आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या साथीने पँनल उभा केला होता. आताही त्यांचा पुन्हा तोच प्रयत्न राहणार आहे. प्रतिस्पर्धी पँनलमध्ये माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल व माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांचे नेतृत्व होते. मात्र ठळक चेहरे वगळता या पँनलला पराभूत व्हावे लागले होते. यावेळी आमदार शिरिषकुमार कोतवाल
हेही तगडा पँनल देण्याच्या तयारीत आहे. यावेळी शिवसेनेची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे. तेच समिकरणे येथे झाली तर हे तिन्हीं पक्ष एकत्र येऊन लढु शकतात. मात्र सहकारात फारसे पक्षीय बंधन नसते. त्यामुळे तोच फार्मुला लागु होईल असेही नाही. इकडचे तिकडे व तिकडचे ईकडे असे झाले तर फारसे नवल वाटायचे कारण नाही. मात्र डॉ.कुभांर्डे व कोतवाल यांच्या पँनलमध्ये लढत होईल हे निश्चित. माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. . का ते पक्षीय समिकरणे पाहतात की अन्य वेगळा मार्ग निवडतात हे पाहणे औस्तुकत्याचे ठरणार आहे.गत एम.व्ही.पी.निवडणुकीत त्यांनी वेगळा प्रयोग करून विजयश्री संपादन केली होती.
बाजार समितीत अनेकदा निवडून आलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
गत वेळी डॉ. कुभांर्डे यांच्या बरोबर असणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व विद्यमान उपसभापती नितिनदादा आहेर ह कोणती भूमिका घेतात हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तिसर्या पँनल निर्मितीच्या दुष्टिनेही हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सीए. शांताराम ठाकरे व माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्ते यांनी त्या दुष्टिने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे तिसरा पर्याय उभा राहतो की ते या दोन्हीं मधील एखाद्या पँनलला पाठिंबा देत उमेदवारी करतात हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. एकुणच परिस्थिती लक्षात घेता यावेळी नवीन अनेक उमेदवार ईच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र बाजार समितीचे मतदान संपूर्ण तालुक्यातील असल्यानं दोन तीन गावांमध्ये प्रभाव असणाऱ्या उमेद्वारांपेक्षा संपूर्ण तालुक्यात संपर्क असणाऱ्या उमेदवारांना पँनलमध्ये संधी मिळू शकते. तसेच या निवडणुकीत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने ईच्छुकांची आर्थिक क्षमता हाही निकष महत्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड गत निवडणूकीत काहीसे अलिप्त होते. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र पँनल बनविण्यासाठी गळ टाकल्याने ते काय भूमिका घेतात हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र डॉ. कुभांर्डे हे राजकीय व्युहरचनेत तरबेज असल्याने विरोधकांची बेकी त्यांना फायदेशीर ठरू शकते तर विरोधकांची ऐकी त्यांना आव्हान उभे करु शकते. विरोधकांमध्ये नेत्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यातील संवादही तितकाच महत्त्वाचा घटक आहे लवकरात लवकर पँनल निर्मिती करून प्रचारात आघाडीसाठी प्रयत्न होतो की उमेदवारीचाच घोळ शेवटपर्यंत चालू राहतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . त्या तुलनेत निर्णय स्वातंत्र्य असल्याने डॉ. कुभांर्डे हे लवकर पँनल निर्मिती करुन प्रचारासाठी लवकर सुरुवात करु शकतात . उमेदवारीसाठी एन.टी.गटात फारसी चुरस नसली तरी सोसायटी गटात मात्र मोठ्या प्रमाणावर चूरस पाहावयास मिळत आहे. पँनलमध्ये विद्यमान संचालक मंडळातील कोणाचा पत्ता कट होतो तर कोणत्या नवीन चेहर्यांना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ऐवढे मात्र निश्चित दिवाळीपूर्वीच दसर्याच्या शुभेच्छांच्या निमित्ताने का होईना ईच्छुकांनी पर्वणी साधत जनसंपर्कास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे बाजार समित्यांची मुदत संपून वर्ष उलटले , तरी निवडणुका झालेल्या नाहीत . ( APMC election postpone due to covid19 apedamic ) काही ठिकाणी मुदतवाढ , तर काही ठिकाणी प्रशासक मंडळ सध्या कामकाज पाहत आहे . ( In some APMC Administrator took charge ) मात्र आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या मुदतवाढीला ब्रेक लावत निवडणुकीचा मुहूर्त निश्चित केला आहे . ( Now Election will take place in month of January ) त्यानुसार सोमवार ( ता . ११ ) पासून मतदार याद्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे . जिल्ह्यातील १० हून अधिक बाजार समित्यांच्या मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुकीचा फड आता रंगणार आहे .
निवडणुकांसाठी प्रारूप व अंतिम मतदारयाद्या ३० सप्टेंबर या अर्हता दिनांकावर तयार कराण्याच्या सूचना दिल्या आहेत . निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था व गटविकासाधिकाऱ्यांकडून सदस्य सूची मागविण्याची प्रक्रिया सोमवार ( ता . ११ ) ते शुक्रवार ( ता . २२ ) पर्यंत पूर्ण करायची आहे . प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सोमवारी ( ता . २५ ) सुपूर्द करावी . सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी ३ नोव्हेंबरपर्यंत तयार करावी व सचिवाने विहित नमुन्यातील प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे . कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामपंचायत व सोसायटीच्या राजकारणालाही पुन्हा एनर्जी मिळणार आहे .
बाजार समिती . असा आहे कार्यक्रम –
पारूप मतदारयादी प्रसिद्ध : १०नोव्हेंबर –
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : ६डिसेंबर –
उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती : १६ ते -22 डिसेंबर.
अर्ज छाननी : २३ डिसेंबर – माघार : २४ डिसेंबर ते ७ जानेवारी 2022
मतदान : १७ जानेवारी – मतमोजणी : १८ जानेवारी

