जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर येथे मानव स्पर्श सेवाभावी संस्था लासलगाव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण पालवे सरपंच ग्रामपंचायत वेळापूर हे होते . मानव स्पर्श सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती श्री सुनील देवढे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.

या प्रसंगी मानव स्पर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील वाघचौरे , कार्याध्यक्ष अरुण देवढे सर,श्री.सूर्यकांत जाधव , सचिव श्री.समीर देवढे ,खजिनदार श्री.सुनील देवढे , संस्थेचे सदस्य योगेश न्याहारकर , सोपान जाधव , केशव जाधव , डॉ.शशिकांत देवढे,श्री. ज्ञानेश्वर देवढे ,सौ.सुरेखा देवढे , श्री.ज्ञानेश्वर शिंदे तसेच गावाचे उपसरपंच सौ.माया किशोर कुटे, शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.संतोष कुटे ,उपाध्यक्ष श्री.जालिंदर भागवत,श्री. केदुजी शिंदे,
ग्रां. प. सदस्य सौ.अर्चना.एकनाथ कुटे, किशोर कुटे सतिष शिंदे, भावडू पवार, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.सचिन शेलार यांनी केले व आभार श्री.गणेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका श्रीमती माया भावसार तसेच सौ संगीता लहाने ,सौ. वाल्याबाई शेरेकर यांनी प्रयत्न केले

