[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड शहरातून सायकल रॅलीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन…??
युवासेनेचा केंद्र शासनास सवाल

चांदवड शहरातून सायकल रॅलीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध

सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना “अच्चे दिन” दाखविण्याचे वचन दिले होते.पण,निवडणुकीनंतर “चुनावी जुमला” म्हणत तमाम भारत वासियांना महागाईच्या खाईत ढकलले आहे. देशात इंधन दरवाढीने जतना होरपळून जात असताना,पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्चे दिन?असा सवाल करीत आज पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार चांदवड तालुका व शहर युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला.

यावेळी बोलताना रोहित ठाकरे यांनी,देशात पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीचा उच्चांक झाला आहे.इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी,शेतकरी,बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना त्यात दर दिवशी आणखी वाढ करत आहे.पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असतांनाही केंद्र सरकार यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही म्हणून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पर्यावरण मंत्री नाम.मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारविरूध्द राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनाची दखल घेवून,जनतेच्या मनातील रोष ओळखून केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी,अशी मागणीही श्री.रोहित ठाकरे यांनी केली.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांतभाई देवरे भूषण मुळाने तालुकाप्रमुख रोहित ठाकरे शिवसेना शहरप्रमुख संदिप उगले केशव ठाकरे तालुका संघटकउपशहरप्रमुख सचिन (गुड्डू) खैरनार शहर संघटक प्रसाद प्रजापत पशहरप्रमुख विनायक हाडगे मुकेश कोतवाल शंभु खैरे अकबरभाई फिरोजभाई पठाण शहरप्रमुख राज केदारे सुरज भोसले ज्ञानेश्वर पाटील महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई जाधव रोहिणीताई वाघ युवती तालुका उपाध्यक्ष ममता बागुल युवती अध्यक्ष अपर्णाताई अहिरे विजू फापाळे किरण सोनवणे देविदास शिंदे प्रकाश चव्हाण गोविंद चौधरी रमेश चौधरी जालिंदर दिवटे मनोज सूर्यवंशी नवनाथ आवारे सामाजिक सोनवणे गमाजी सोनवणे शंभू खैरे माणिक ठाकरे संदीप पवारआदी युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या