[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गरगर मोळ्या या त्रैभाषिक बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

गरगर मोळ्या या त्रैभाषिक बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन

चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाच्या पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळ्यात बालदिनाचे औचित्य साधून चांदवड येथील कवी रावसाहेब जाधव यांच्या त्रैभाषिक बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ समीक्षक एकनाथ पगार यांच्या हस्ते आणि प्रा. डॉ. जयवंत भदाणे, डॉ. राजेंद्र मलोसे, पत्रकार प्रशांत भरवीरकर, प्रकाशक रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले.

बालसाहित्यात कल्पकता अधिक महत्त्वाची असते, असे मत डॉ. एकनाथ पगार यांनी व्यक्त केले गरगर मोळ्या हे पुस्तक एक नाविन्यपूर्ण व मराठी साहित्यातील प्रथम प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. या संग्रहातील मूळ मराठी कवितांचे इंग्रजी अनुवाद राहूल केदारे यांनी तर हिंदी अनुवाद डॉ संजय बोरुडे यांनी केला आहे. किशोरचे संपादक मा किरण केंद्रे व अक्षरपेरणीचे संपादक बाळासाहेब घोंगडे यांचे ब्लर्ब या पुस्तकास मिळाले आहे.

या पुस्तकाचे सर्व बालके व त्यांचे पालक स्वागत करतील असे मत डॉ मलोसे यांनी व्यक्त केले…

कवी जनार्दन देवरे, कवी रवींद्र देवरे, कवयित्री सुशीला संकलेचा, पत्रकार हर्षल गांगुर्डे, कवी प्रफुल्ल सोनवणे, ग्राफिक्सकार रोहन कापडणे, कवी मधुकर रौदळ, पत्रकार महेंद्र गुजराथी, कवी राजेंद्र पगारे, कवयित्री रुपाली खैरनार, कवी अविनाश वाघ, कवी वाल्मिक सोनवणे, पत्रकार विक्रम देवरे, कवयित्री शीला पाटील, कवी संजय पाडवी, कवी संदीप गुजराथी, कवयित्री सविता दरेकर, कवयित्री सविता दिवटे, कवी सोमनाथ पगार, पत्रकार सुदीप गुजराथी, कवी शांताराम हांडगे, पत्रकार दीपक निकम, कवयित्री शैलजा जाधव, लेखिका वंदना गांगुर्डे, लेखिका वैशाली जाधव, अजित जाधव, बाळकृष्ण जाधव, चित्रकार देव हिरे, करण सोनी, माणिक गांगुर्डे, भगवंत बोरगुडे कवी सागर जाधव जोपुळकर आदींनी रावसाहेब जाधव यांचे अभिनंदन केले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या