[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुगांव येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना स्म्रृतीदिनानीमीत्त विनम्र अभिवादन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दुगांव ता.चांदवड येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांना स्म्रृतीदिनानीमीत्त विनम्र अभिवादन


क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शांताराम सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. बहुजनांमध्ये शिक्षणाचे बीज पेरणारे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक आहेत.
ज्या वेळी बहुजन समाज गुलामीत अंधःकारात, अंधश्रधेच्या अज्ञानात जीवन जगत होता तसेच ज्या काळात स्त्री हि फक्त चूल आणि मुलं यापूर्तीच मर्यादित होती. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप मानले जायचे अश्या भयग्रस्त वातावरणात महात्मा फुलेंनी बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले. बहुजनांच्या अधोगतीच एकमेव कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे हे सर्वप्रथम महात्मा फुलेंनी ओळखले होते. म्हणून महात्मा फुलेंनी आपल्या समाज सुधारणेची सुरुवात स्त्री – शिक्षणापासून केली होती. तत्कालीन समाज व्यवस्थेचा रोष, धर्ममार्तंडाचा विरोध, सहन करून महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले होते. महात्मा फुलेंनी बहुजनांसाठी स्थापन केलेल्या शाळेमध्ये एक रुपया हि न घेता ज्ञान दानाचे कार्य केलेले आहे. अशा महामानवास स्म्रृतीदीनी विनम्र अभिवादन।
या कार्यक्रमास भगवान मंडलिक, रंगनाथ सोनवणे,शांताराम सोनवणे, पंडित आहेर, देविदास सोनवणे, बापु तांबे,निलेश सोनवणे, वैभव तांबे,महेश सोनवणे, दत्तु सोनवणे, मजित शेख,गणेश गायकवाड,भगवान महाजन,नंदकिशोर आहेर,ओम जगताप दत्ता सोनवणे व समाज बांधव उपस्थीत होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या