[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला गुरुकृपा वायर इंडस्ट्रीजचे उद्घाटन संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड- येथील लासलगाव रोडवरील उद्योजक आनंदा शिंदे यांच्या गुरुकृपा वायर इंडस्ट्रीजचे उद्घाटन के.के. ट्रेडिंग कंपनीचे संचालक कैलास कोतवाल यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरीषकुमार कोतवाल,सौ.रेखा कोतवाल,सरपंच पिंटू भोयटे,झुंबर शिंदे,सौ.विमलबाई शिंदे,उमेश पगार,अर्जुन भोयटे,माणिक भोयटे,रामदास गांगुर्डे उपस्थित होते.
मराठी तरुण शेती सांभाळून उद्योगधंद्यांत येतो आहे ही अभिमानस्पद गोष्ट असल्याचे मत शिरीष कोतवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष संजय जाधव,समाधान जामदार,आनंदा शिंदे,गोरख शिंदे,फौजी शांताराम शिंदे,बाळकृष्ण शिंदे,रमेश वाकचौरे, रोहिदास शिंदे,रुपाली शिंदे, प्रियंका शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी केले तर गोरख शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या