[masterslider id="2"]
अध्यात्मिक राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

भव्य काशी दिव्य काशी चा उद्घाटनाचा चांदवडला आनंद उत्सव साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

भव्य काशी दिव्य काशी चा उद्घाटनाचा चांदवडला आनंद उत्सव साजरा

रेणुका मातेची आरती आणि भक्तांचा उत्साह.. बघा व्हिडीओ

चांदवड : आज 13 डिसेंबर रोजी देशाचे  पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर चांदवड शहरांमध्ये “दिव्य काशी,भव्य काशी” या नावाने श्री रेणुका देवी तीर्थक्षेत्र या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला तसेच आनंदोत्सव साजरा केला. यावेळी चांदवड शहरा बरोबर जिल्हा स्तरावर अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. श्री रेणुका देवी मंदिर येथे देवीची आरती करण्यात आली. तसेच सर्वांना प्रसाद वाटप करून जय जयकार करत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री भुषण कासलीवाल हे जिल्ह्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते.यांच्या प्रमुख उपसथितीत चांदवड येथील कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,
ह.भ.प. कदम माऊली, ह.भ.प. नवनाथ महाराज, किशोर शत्रिय, मनोज बांगरे, महेश बोराडे, बाळा पाडवी, ज्ञानेश्वर बरकले, बापू चव्हाण,विजय जोशी गुरु,सागर आहेर आदी नागरिक उपस्थित होते.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या