अर्थसंकल्प विशेष
पैठणीवरील जीएसटी कर रद्द करण्यात यावा
उत्पादित झालेल्या मालावरील विक्री करिता सुशिक्षित बेरोजगारांना मोठमोठ्या शहरांमध्ये हातमागावरील उत्पादने विक्रीची दालने सुरू करण्यासाठी सरकारी बँकांकडून अत्यल्प दरात भांडवल देण्यात यावे, महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या हातमाग उत्पादन क्षेत्र येवला व येवला तालुक्यातील विणकरांच्या कौशल्य वृत्ती साठी कॉमन फॅसिलिटी सेंटरची उभारणी करण्यात यावी ,नवतरुणांना हातमाग उत्पादित करण्याचे तंत्रज्ञान अवगत होण्याकरिता शासन स्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी ,त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात यावी अंतर्गत विणकरांना देशांतर्गत नवीन नवीन हातमागाचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण साहित्य नवीन हातमाग यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात यावी तसेच येवला सिल्क सिटी म्हणून घोषित करण्यात यावी,पैठणी उत्पादकाला आयकराच्या कक्षेतून वगळण्यात यावे, कच्च्या मालाला लागणारा जीएसटी रद्द करण्यात यावा ,आगामी अर्थसंकल्पामध्ये हातमाग उद्योगाकरता शासनाने बनारस च्या धर्तीवर येवला हातमाग क्षेत्राचा क्षेत्राचा विकास करण्यात यावा, तसेच अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त निधी तरतूद करण्यात यावी.
…………………………………………………………………….
देशाची ऐतिहासिक वस्त्र परंपरा जोपासणारी हातमाग हस्तकला जर खर्या अर्थाने टिकवायची असेल तर कच्च्या मालावरील जीएसटी तात्काळ रद्द करावा व या व्यवसायाला अल्पदरात वित्तपुरवठा करण्यात यावा.
मनोज दिवटे ,दिवटे पैठणी येवला.
………………………………………………………………….
कोरोना काळात आयकरात सूट मिळावी,G ST भरलेला परतावा मिळुन ,नवीन व्यवसाय उभारणीसाठी 3 ते 4 टक्के वार्षिक दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे..
आकाश ठोंबरे,लावण्य पैठणी जळगाव नेऊर.

