[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सुपर मार्केट मधून वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्याची मागणी

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगांव रेपाळ (वार्ताहर) :-सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास येवला तालुका समिती तर्फे करण्यात आली आहे.

याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे तालुका संघटक मोहन कुंभारकर यांनी येवला तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन दिले आहे त्यात नमूद केले आहे की महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवी आहे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे मात्र हा निर्णय शेतकरी हिताचा नाही. तर दारूची व्यसनाधीनता वाढविणारा ठरेल असे निर्णय घेऊन राज्याला कुठे घेऊन जाणार हा प्रश्न आहे वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनापासून अंमली पदार्थापासून मदयापासून प्रवृत्त करणे तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असतानाही केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला रान मोकळे करणारा हा निर्णय आहे हे चुकीचे आहे. हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा अन्यथा माननीय अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास येवला तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर येवला तालुका संघटक मोहन कुंभारकर, सुनील मुरकुटे, जालिंदर मेंगाने, चंद्रभान मोरे ,पुंडलीक बिडवे ,मनोहर सोनवणे, श्रावण वाघमोडे ,सोपान पगार, दगू वाघमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या