जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत 2702 हेड अंतर्गत। दोन कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
तळेगाव रोही गटात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत 2702 हेड अंतर्गत। दोन कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यात चालू आर्थिक वर्षात व मागील आर्थिक वर्षात एकूण 2 कोटी60 लक्ष रुपये सिमेंट बंधारे दुरुस्ती व नवीन सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधणे गाव तलाव दुरुस्ती इत्यादी
कामासाठी मंजूर झाले असून या महिनाअखेर ही सर्व कामे सुरू होतील यात 1 ) कोल्हापूर टाईप बंधारा बांधणे दुरुस्ती करणे वाकी बुद्रुक 16 लाख रुपये 2 )सिमेंट बंधारा दुरुस्ती करणे रेडगाव पाच लक्ष रुपये 3 ) सिमेंट बंधारा दुरुस्ती करणे रेडगाव दोन साडे पाच लक्ष रुपये 4 )कोटा बंधारा दुरुस्ती करणे रेडगाव साडे सहा लक्ष रुपये 5 गाव तलाव दुरुस्ती करणे न हनावे दहा लक्ष रुपये 6 )सिमेंट प्लग बंधारा दुरुस्ती करणे गांगुर्डे वस्ती निंबाळे सात लक्ष रुपये 7 )सिमेंट काँक्रेट बंधारा बांधणे वडगाव पंगु क्रमांक एक 25 लक्ष रुपये 8 )सिमेंट काँक्रेट बंधारा बांधणे वडगाव पंगु- 2 25 लक्ष रुपये 9 )सिमेंट काँक्रेट बंधारा बांधणे रापली 31 लक्ष रुपये 10) सिमेंट प्लग बंधारा दुरुस्ती वाहेगाव साळ दहा लक्ष रुपये 11)कोटा बंधारा दुरुस्ती करणे वाहेगाव साळ पाच लक्ष रुपये 12)सिमेंट काँक्रेट बंधारा बांधणे पन्हाळे सोळा लक्ष रुपये 13) सिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे कातरवाडी क्रमांक एक 29 लक्ष रुपये14) सिमेंट काँक्रेट बंधारा बांधणे कातरवाडी क्र दोन 29 लक्ष रुपये 15 )कोटा बंधारा दुरुस्ती रेडगाव साडेसात लक्ष रुपये 16 ) सिमेंट काँक्रीट बांधा रापली वीस लक्ष रुपये सिमेंट काँक्रेट बांधारा17) वागदर्डि साडेचौदा लक्ष रुपये 18)सिमेंट काँक्रेट बंधारा दुरुस्ती काजी सांगवी पाच लक्ष रुपये सिमेंट 19) काँक्रीट बंधारा दुरुस्ती भडाणे दहा लक्ष रुपये (प्रस्तावित )20)सिमेंट काँक्रीट बंधारा दुरुस्ती पिंपळद दहा लक्ष रुपये( प्रस्तावित) एकंदरितच तळेगाव रोही गट हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग असून पावसाचं पाणी जे पडतं हे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जातं मधल्या काळामध्ये फयान व
अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात झाल्याकारणाने अनेक पाझर तलाव सिमेंट कॉंक्रीट बंधारे यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली ते दुरुस्त करणे गरजेचे होते जलयुक्त शिवार मध्ये मोठी कामे झाली परंतु जी कामे शिल्लक राहिली होती ही मागील पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यात आत्तापर्यंत जिल्हा परिषद मधील लघु पाट बंधारे विभागांतर्गत 2702 अंतर्गत निधी असतो त्यातून मागील पाच वर्षात तब्बल चार ते सहा कोटी रुपये उपलब्ध केले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जलसंधारणाची पाणी अडवण्याची व गरज असेल त्या ठिकाणी नवीन सिमेंट बंधारा बांधण्याची कामे करण्यात यश मिळाले याचा मला मनस्वी आनंद आहे व लोकांमध्ये ही समाधानाचे वातावरण आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी साठणार असल्याने त्याचा फायदा शेती साठी होणार आहेत जमिनीची पाणी पातळी वाढण्यात मदत होणात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवल्या बद्दल गटांतील जनतेकडून अभिनंदन केले जात आहे

