दि.१९ एप्रिल ०२२ रोजी जि.प.रोजी जि.प.शाळा आडगाव रेपाळ येथे शासन आदेशानुसार शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विविध बँनर व फलक घेऊन वेगवेगळ्या घोषणा देत गावात वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली.कार्यक्रमाच्या उद्घघाटनाची फित सरपंच तुकाराम गुंजाळ तसेच उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण निकम यांच्या शुभहस्ते कापण्यात आली.या मेळाव्यात नोंदणी कक्ष,शारीरिक विकास कक्ष,बौद्धिक विकास कक्ष,सामाजिक व भावनिक विकास कक्ष,भाषा विकास कक्ष,गणनपूर्वतयारी कक्ष,प्रमाणपत्र वितरण कक्ष अशा विविध स्टाँलची निर्मिती करण्यात आली होती.१२ विद्यार्थ्यांचा पहिली प्रवेश निश्चित करण्यात आला.पुष्प व चाँकलेट देऊन नवोदितांचे स्वागत करण्यात आले.सेल्फी पाईंटचा विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद लुटला.याप्रसंगी सरपंच तुकाराम गुंजाळ,उपसरपंच व शालेय व्यवस्थापन अध्यक्ष रामकृष्ण यादवराव निकम,माजी सरपंच नारायणभाऊ गुंजाळ,ग्रा.पं.सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल,गोरख जगताप, नवनाथ पगारे,गौतम संसारे,श्रावण गुंजाळ, महेश महाले,समाधान गायके,नवनाथ निकम,सुरेश बागुल,सरला दिक्षित,माया पगारे,मिराताई तनपुरे,मुख्याध्यापक रमेश उगले,सहशिक्षक शिवाजी आहेर,सुरज झाल्टे,विकास कदम,संदीप चव्हाण,राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

