[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापती पदी कैलास कोतवाल यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड- चांदवडच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी राधिका ग्रुप व के.के.ट्रेडींग कंपनीचे संचालक कैलास कोतवाल यांची तर उपसभापतीपदी भाऊसाहेब जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
कैलास कोतवाल यांनी शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनल मधून सोसायटीची निवडणूक लढविली होती त्यात त्यांना भरघोस मते मिळाली. सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाली त्यामुळे कैलास कोतवाल यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे मार्गदर्शक शिरीषकुमार कोतवाल यांनी कैलास कोतवाल यांचा सत्कार केला व नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाला शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, विजय कोतवाल,मनोहर बनकर,प्रवीण हेडा, सुशील पलोड, संतोष पांडे,आदित्य फलके, किरण हेडा,सचिन कोतवाल,पप्पू हेडा,नंदकुमार कोतवाल,सुभाष शेळके,सुभाष कोतवाल,शंकर देशमाने,विठ्ठल पगार,कुंदन शेलार,आनंद बनकर,कुसुम कोतवाल,संगीता जाधव ,दिलीप भुरे आदींसह कांदा व्यापारी असोसिएशन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या