[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

निंदनीय वक्तव्य करणार्यांविरोधात कारवाई करा :चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिस निरीक्षकांना निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

निंदनीय वक्तव्य करणार्यांविरोधात कारवाई करा :चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिस निरीक्षकांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्यावर निंदाजनक टीका करत हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट आणि त्यांचा खून करण्याबाबत भडकावू वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा. तसेच केतकी चितळे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा व शिक्षा व्हावी अशी मागणी चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याकडून करीत आहोत .या आशयाचे निवेदन चांदवडचे पोलिस निरीक्षक सामिर बारवकर यांना देण्यात आले आहे.


अभिनेत्री केतकी चितळे हिने नितीन भावेची पोस्ट शेअर करून खासदार शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अतिशय खालच्या भाषेत निंदाजनक टीका केली आहे. या पोस्टमध्ये श्री पवार यांच्या आजाराबाबत व व्यंगा बाबत हिणवण्यात आले असून त्यांची निंदा आणि थट्टा करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्याच्या आजाराबद्दल त्यांना हिणवणे अतिशय निषेधार्थ आणि गंभीर आहे. सदर पोस्टवर निखिल भामरे (बागलान कर ) याने देखील खालच्या पातळीवरील पोस्ट टाकली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता वरील सर्वांवर विविध कायदेशीर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी.
दत्तात्रय वाघचौरे ,दसरथ ठाकरे, शिवाजी सोनवणे ,सुधीर कबाडे, किरण आहेर, संदिप शिंदे, विकी जाधव, विवेक खूटे ,संतोष ठाकरे, शांताराम पवार ,विकास संसारे, चागंदेव खागांळ , मतीन घासी, डाॅक्टर वानखेडे ,भूषण शेळके, रामभाऊ शिंदे, सलीम पटेल आदी कार्यकर्त उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या