[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मालसाने सोसायटीच्या सभापतीपदी हरीभाऊ माधवराव जाधव तर उपसभापतीपदी सौ . ताराबाई रामभाऊ बोरगुडे यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मालसाने सोसायटीच्या सभापतीपदी हरीभाऊ माधवराव जाधव तर उपसभापतीपदी सौ . ताराबाई रामभाऊ बोरगुडे यांची बिनविरोध निवड

चांदवड तालुक्यातील मालसाने वि का . सेवा. सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी श्री हरीभाऊ माधवराव जाधव तर उपसभापतीपदी सौ .ताराबाई रामभाऊ बोरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. _हरीभाऊ जाधव हे चांदवड खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिवंगत माधवराव जाधव यांचे चिरंजीव तर चांदवड येथील ख्यातनाम डाँक्टर शामराव जाधव यांचे बंधू असुन राजकीय वारसा लाभलेल्या हरीभाऊ जाधव यांच्या निवडीप्रसंगी समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला._
निवडणूक अधिकारी तथा सहकार अधिकारी श्री दिपक तांबर यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव के श्री.अरूण जाधव वं मदतनीस रमेश शिंदे यांच्या उपस्थीतीत सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक झाली. निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या या विशेष सभेत श्री हरीभाऊ माधवराव जाधव यांची सभापती पदासाठी तर ताराबाई रामभाऊ बोरगुडे यांची उपसभापतीपदी बिनवीरोध निवड झाली .
यावेळी पॅनलचे नेते रामदास बोरगुडे, श्री एकनाथ महाले, श्री निवुत्ती जाधव श्री रामदास जाधव मांनी मनोगत व्यक्त केले .व आपल्या अभिनंदनपर भाषणातून विजयी उमेदवारांना भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थितीतांमध्ये डॉ . शामराव जाधव, प्रकाश शिंदे , शहाजी जाधव , माधव जाधव दिपक जाधव, कौतिक जाधव, संतोष जाधव, प्रकाश जाधव,केशव बोरगुडे, रमेश जाधव,मनोज जाधव, संतु बोरगुडे,भरत महाले, दत्तु जाधव,काशिनाथ जाधव,चेतन शिंदे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ निवडीप्रसंगी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या