भाटगांव वि. का. सोसायटीवर विकास पॅनलची सत्ता :
चंद्रकांत (आण्णा) पाटील यांच्या गटाने राखली १९८१ पासुन ची ४० वर्षाची परंपरा..
चांदवड तालुक्यातील भाटगांव वि. का. सोसायटीची निवडणुक विद्यमान चेअरमन चंद्रकांत (आण्णा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांच्या विकास पॅनलचा ११ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला असुन २ जागा बिनविरोध निवडुन आल्या. विरोधी गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.
इ.मा.वर्गातुन संजय मोरे व एन.टी. अशोक कांदळकर बिनविरोध निवडुन आले. सर्वसाधारण गटातुन कवात भाऊसाहेब २९८, गवळी त्र्यंबक २४७, डुंबरे तुकाराम २८०, पाटील चंद्रकांत २६६, पोटे म्हसु २६३, मांदळे त्र्यंबक २९२, मांदळे दत्तु २७७, मांदळे रावसाहेब २७०, अनु.जाती शेजवळ धोंडीराम २२९ स्री राखीव पोटे बेबीताई २६८, वैराळ संगीता २४८ मते मिळवुन विजयी झाले. ५२० पैकी ४१८ मतदान झाले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन पाटोळे पोपट यांनी काम पाहीले. सचिव कासव तसेच संस्थेचे सचिव जाधव सोमनाथ, लिपीक क्षिरसागर बाबाजी यांनी सहकार्य केले.

