अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज करण्याचे तालुका कृषि अधिकारी सोनवणे यांचेआवाहन
चालू खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन,मका,बाजरी,मूग,उडीद,तूर यांचे प्रामाणित बियाणे ५०%अनुदानावर व प्रात्यक्षिकांसाठी १००% अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर “वैयक्तिक शेतकरी योजना” या शीर्षकांतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेत स्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.शेतकरी बांधव संगणक,लॅपटॉप,सामुदायिक सुविधा केंद्र,ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र या ठिकाणांवरून अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू इच्छिणार्या शेतकरी बांधवांना आपला आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.त्यानंतर प्राप्त अर्जांची कृषी आयुक्तालय,पुणे येथून ऑनलाईन सोडत काढून लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.
– विलास सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,चांदवड
जाधव आणि कंपनी मार्केट यार्ड, चांदवड जि. नाशिक 9404805068, 9422256855 बियाणे - रा. खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेते



जाधव आणि कंपनी
मार्केट यार्ड, चांदवड जि. नाशिक
9404805068, 9422256855
बियाणे - रा. खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेते