[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला महाविकास आघाडीचा केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात रास्ता रोको महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मागील ५ ते ६ वर्षांपूर्वी कांद्यास ५ ते १० रुपये बाजारभाव मिळत होते . त्यावेळची परिस्थिती ,त्यावेळची महागाई याचा विचार करता व तुलनात्मक विचार करता आजची शेती न परवडणारी झालेली आहे . शेतीसाठी बियाणे ,रासायनिक खते ,औषधे ,मजुरी ,ट्रान्सपोर्ट इत्यादीच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे . त्या तुलतेने शेतीमालाचे बाजारभाव आहे त्याच किंमतीत विक्री होत आहे .त्यामुळे शेतकरी यांच्यावर उपासमारीची व कर्जबाजारी वेळ आली आहे

चांदवडला महाविकास आघाडीचा केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात रास्ता रोको महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या

कांद्याला हमीभाव मिळावा , महागाई कमी व्हावी , या मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे येथील पेट्रोल पंप चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन

 

चांदवड :
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध तसेच कांद्याला हमीभाव मिळावा , महागाई कमी व्हावी , या मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे येथील पेट्रोल पंप चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात गुरुवार , दि . २ रोजी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल , माजी आमदार उत्तमबाबा भालेराव , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . प्रारंभी सर्व कार्यकर्ते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये जमा झाले , तेथे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ . सयाजीराव गायकवाड , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव , शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख नितीन आहेर ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विलास भवर , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी रघुनाथ आहेर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,दत्तात्रय वाघचौरे , काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष समाधान जामदार , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव , रेवण ठाकरे , कॉ . भास्करराव शिंदे , अॅड . दत्तात्रय गांगुर्डे , राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल तालुकाध्यक्ष दशरथ ठाकरे ,शिवसेनेचे युवासेनेचे रोहित ठाकरे ,माजी सभापती यू . के . आहेर , अन्वर पठाण यांची केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करणारी भाषणे झाली . यानंतर नेते व कार्यकर्ते बैलगाडीतून पेट्रोल पंप चौफुलीवर गेले . तेथे सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . तहसीलदार प्रदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले . यावेळी
आले.यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, नितीन आहेर,संजय जाधव,डॉ.सयाजीराव गायकवाड,विलास भवर,राहुल कोतवाल, विजय जाधव,
रघुनाथ आहेर,शहाजी भोकनळ , परशराम निकम , समाधान जामदार , प्रकाश शेळके , राजेंद्र ठाकरे , अॅड . दत्तात्रय गांगुर्डे , विक्रम जगताप , विकी जाधव , सदाशिव पवार , किसन साठे , सुभाष जाधव , अॅड . नवनाथ आहेर , बापू शिंदे , शिवाजी कासव , अल्ताफ तांबोळी , अनिल पाटील , उत्तमराव ठोंबरे , दत्तात्रय वाकचौरे , संदीप उगले , भाऊसाहेब शेलार , शैलेश ठाकरे , अॅड . भरत ठाकरे , डॉ . दिलीप शिंदे , दिपांशु जाधव,चंद्रकात देवरे , डॉ . श्यामराव जाधव यु.के.आहेर, ,अनिल पाटील, पंकज दखणे, माधव पवार, सुखदेव खैरनार,किरण ठाकरे,
संदिप पाटील,तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते .

आंदोलनामुळे मुंबई आग्रा रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूला ठप्प झाली होती. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या शेतकरी व इतर घटकांच्या विरोधातील धोरणांमुळे होणाऱ्या अन्यायकारक बाबींचा वक्त्यांनी निषेध व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यात व चांदवड तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते .चांदवड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील कांद्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी आहे .यावर्षी शेतक -यांनी मोठ्याप्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केलेली आहे . मात्र सद्यस्थितीत बाजार पेठांमध्ये कांद्यास प्रति किलो रु . ५ ते १० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे .देशामध्ये महागाईचा भस्मासुर माजलेला असतांना शेतक -यांच्या पदरी फक्त कवडीमोल बाजारभाव मिळत आहे .

मागील ५ ते ६ वर्षांपूर्वी कांद्यास ५ ते १० रुपये बाजारभाव मिळत होते . त्यावेळची परिस्थिती ,त्यावेळची महागाई याचा विचार करता व तुलनात्मक विचार करता आजची शेती न परवडणारी झालेली आहे . शेतीसाठी बियाणे ,रासायनिक खते ,औषधे ,मजुरी ,ट्रान्सपोर्ट इत्यादीच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे . त्या तुलतेने शेतीमालाचे बाजारभाव आहे त्याच किंमतीत विक्री होत आहे .त्यामुळे शेतकरी यांच्यावर उपासमारीची व कर्जबाजारी वेळ आली आहे .जिल्हातील कांदा उत्पादक शेतक-यांचे कुटुंब या पिकावर अवलंबून असते .भविष्यात वाढत्या आवकचा विचार करता दर अजुन दर घसरण्याची शक्यता आहे .त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण होवून शिल्लक राहिलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहणेस मदत होणार आहे . याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास शेतक-यांकडुन मोठ्याप्रमाणात जन-आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही . नैसर्गिक आपत्तीना बाधित शेतकरी बांधवांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून निर्यातीसंदर्भात कोणत्याही अटी व शर्ती न टाकता निर्यातीस प्रोत्साहन देणे व विक्री केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल रु . ५०० / – प्रमाणे अनुदान देण्यात येऊन कांद्यास हमीभाव देण्यात यावा याबाबत आपले स्तरावरून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता आज चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आले.केंद्र सरकार कायमस्वरूपी शेतकरी हिताविरोधातच आहे .फक्त उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे व पोष्टरबाजीवर भरमसाठ खर्च करून जनतेची दिशाभूल करणारे केंद्र सरकार प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे .तसेच केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी ,व्यापारी ,सामान्य नागरिक ,मजुर व इतर समाज घटकांच्या हिताच्या दृष्टीकोनातुन आज खालील मागण्या करण्यात आल्या.
कांद्याला ३००० / – रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे व आजपर्यत विक्री झालेल्या कांद्यास प्रति • क्विंटल रु .५०० / – प्रमाणे अनुदान मिळालेच पाहिजे ,
सन २०१९ मध्ये देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र नोंदी यांनी पिंपळगाव (ब) येथील सभेत शेतक – यांना आश्वासन दिले होते की कांद्याला हमीभाऊ देऊ ,परंतु आजपर्यंत हमीभाव दिलेला नाही . त्यावेळेस ते म्हटले होते की मी ज्याचे मीठ खातो त्याला जागतो कुठे गेला तो शब्द . ,
रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढले आहे . ते भाव कमी करावे .
घरगुती गॅसचे भाव कमी करण्यात यावे ( सन २०१३ च्या काळात गॅस ३९० रुपये टाकी होते ते आज १००३ / – रुपये आहे . देशात गरिब कुटूंब चुलीवर स्वयपाक करत आहे . ,
पेट्रोल / डिझेलचे भाव कमी करण्यात यावे .
, खाद्य तेलांचे नाव प्रचंड वाढले आहे . ते कमी करण्यात यावे .
, गव्हाची निर्यात बंद केलेली आहे . ती पुन्हा चालू करावी ,
,सोयाबीनचे पेड आयात बंद करून निर्यात चालु करण्यात यावी .
, घरकुलाला शासकीय अनुदान रु . ३,००,००० / – देण्यात यावे .
, कांदा चाळीला वाढत्या महागाईमुळे रु.३,००,०००/ – अनुदान देण्यात यावे .
, तालुक्यातील नविन रेशनकार्ड धारकांना त्वरीत रेशन चालू करावे . , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते की , तरुणांना नोक – या देऊ , परंतु कोणतीही नोकरी न देता नोक-या कमी करण्यात आलेले आहे तरुन वर्गाना नोकरी उपलब्ध करून द्याव्यात .याप्रमाणे प्रमुख मागण्यांसाठी आज गुरुवार दि .०२/०६/२०२२ रोजी मुंबई – आग्रा रोड , पेट्रोल पंपासमोर , चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे . तरी वरीलप्रमाणे मागण्या मान्य करणेबाबत आपले मार्फत केंद्र शासनास कळविण्यात यावे. तसेच लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या हितासाठी व त्यांना न्याय मिळेपर्यंत यापुढे महाविकास आघाडी तर्फे वेळोवेळी जन आंदोलने करण्यात येतील असे भाषणात सांगण्यात आले.

यावेळी निवेदनाची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब , चांदवडचे तहसीलदार मा . तहसिलदार मा . पोलीस निरीक्षक सो . , चांदवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. निवेदनावर शिरिषकुमार कोतवाल ,नितीन दादा आहेर, संजय जाधव, विलास भवर, डाँ. सयाजीराव गायकवाड , विजय जाधव, शहाजी भोकनळ, परशाराम निकम , रघुनाथ आहेर , समाधान जामदार, यु.के.आहेर, अँड. दत्तात्रय गांगुर्डे,राजेंद्र ठोंबरे, गांगुर्डे विक्रम जगताप ,मतीनभाई घासी, विकी जाधव, सदाशिव पवार, किसनराव साठे, सुभाष जाधव, अँड. नवनाथ आहेर, विजयनाना गांगुर्डे , प्रकाशराव शेळके, अॅड . अन्वर पठाण, बापू शिंदे , रेवन ठाकरे, शैलेश ठाकरे, अँड. भरत ठाकरे , दत्तात्रय वाकचौरे, डॉ . दिलीप शिंदे , संदिप पवार, चंद्रकांत देवरे, रोहित ठाकरे ,डॉ . शामराव जाधव, किरण ठाकरे, दिपांशु जाधव, संतोष शिंदे, समर्थ ठाकरे , गोकुळ जाधव, धनजय जाधव, . पप्पु कोतवाल , जयंवत जाधव , दत्तु कोतवाल , दिपक वाघ धोंडीराम पिंपरकर ,योगेश जाधव , नवनाथ जाधव यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या