महाविकास आघाडी तर्फे केंद्र सरकारच्या विरोधात 2/6/2022 रोजी चांदवड चौफुली पेट्रोल पंप समोर भव्य रस्ता रोकोआंदोलन करण्यात आले. महविकास आघाडी तर्फे काद्याला हमी भाव व इतर मागण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात देि.2/5/2022 रोजी भव्य रस्ता रोकोला मा. आमदार शिरीषकुमार कोतवाल, मा आमदार उत्तमाबाबा भालेराव, मा.नितीन दादा आहेर यांनी मार्गदर्शन केले . 
यावेळी मा तहसीलदार प्रदीप पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.
हमी भाव मिळालेच पाहिज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत सभेत सन मध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की कांद्याला हमीभाव देऊ परंतु भाव दिला नाही.
रासायनिक खताचे भाव प्रचंड वाढले आहे ते भाव कमी करण्यात यावे, घरगुती गॅस चे भाव कमी करण्यात यावे, डिझेल पेट्रोलचे भाव कमी करण्यात यावे. खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहे ते कमी करण्यात यावे. गव्हाची निर्यात बंद केलेली आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी.

यावेळी चांदवड तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड, चांदवड तालुका शिवसेनाप्रमुख विलास भवर, बापूसाहेब शिंदे, विजय पुंजाराम जाधव, सुनील तात्या कबाडे, शिवाजी कासव, प्रकाश शेळके, नवनाथ आहेर, उत्तमराव ठोंबरे , दत्तात्रय वाकचौरे, संदीप उगले, भाऊसाहेब शेलार तसेच चांदवड तालुक्यातील असंख्य महा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.