उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
युद्ध तेव्हाच जिंकलं जातं जेव्हा सेनापती मैदानात उतरतो. याच रीतीने उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे मा. डॉ अशोकथोरात जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक यांनी चांदवड येथे स्वतः दुर्बिनीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ( Laparoscopic tubectomy) करून एक एक वेगळा पायंडा निर्माण केलेला आहे. या पासून प्रेरणा घेऊननक्कीच सर्व वैद्यकीय अधिकारी या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. जर सेनापती रणांगणात उतरला तर सैनिकाला सुद्धा प्रेरणा भेटते व तो तितक्याच जोरात कामाला लागतो .
या पध्दतीचं आदर्श नाशिक जिल्ह्यामध्ये घालून दिला. शिबिरामध्ये 42 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात 1 सेझरियन झालेल्या 2 स्त्रिया 2 सिझेरीयन झालेल्या 14 स्त्रिया तसेच इतर 26 स्त्रियांच्या दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रसंगी मा.जील्हाशल्याचिकित्सक डॉ अशोक थोरात सर, वैद्यकीय अधीक्षक डॉ सुशीलकुमार शिंदे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे सर, भिषक डॉ हेमराज दळवी सर, डॉ चित्तरंजन ठाकरे सर, भुलतज्ञ डॉ शशिकांत देव्हडे, डॉ.सुजाता वाघमारे, डॉ. रमाकांत सोनवणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.विकास गांगुर्डे तथा जिल्हा रुग्णालयातील अधीपरीचारिका लता परदेशी, कशसेवक सचिन बीरार आणि उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील परिसेविका भरती सावंत, अधीपरीचरिका अर्चना बाबरे, मंगला कदम, प्रीती पाठक, नयना हरिनखेडे, भूषण हिरे, अमोल सूर्यवंशी, साई गांगुर्डे, कक्षसेवक रमेश रौंदळ, सुनील भवर, रवी गांगुर्डे, प्रकाश परवे. आदींनी प्रत्यक्ष शस्त्रक्रियागारात काम केले
महावितरण यांचे भारनियमन असल्याने शस्त्रक्रियागारात वातानुकूलन प्रणाली बंद झाली तरीही मा.थोरात सरांनी शस्त्रक्रिया बंद न करता शिबिरातील एकही लाभार्थ्यास सेवेपासून वंचित ठेवले नाही.
शिबिर यशस्वितेसाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशाताई आदींचे सहकार्य लाभले

