[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेवगेडांग सोसायटीच्या चेअरमन पदी पारधी, व्हा.चेअरमन पदी पोरजे युवा नेते साहेबराव उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड

शेवगेडांग सोसायटीच्या चेअरमन पदी पारधी, व्हा.चेअरमन पदी पोरजे
युवा नेते साहेबराव उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड

ईगतपुरी -(नवनाथ अर्जुन पा. गायकर )-

ईगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग व संवेदनशील मानल्या जाणाऱ्या शेवगेडांग आदिवासी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नामदेव पारधी तर व्हा.चेअरमन पदी अर्जुन पा. सयाजी पोरजे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शेवगेडांग सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक ही प्रारंभी अत्यंत चुरशीची होईल अशी चर्चा होती. मात्र अगदी नाटयमय घडामोडी घडत ही सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली होती.

चेअरमन, व्हा.चेअरमन पदाची निवडणूक ही यामुळे अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली.
बिनविरोध निवडणूक पार पाडण्यासाठी युवा नेते तथा माजी सरपंच साहेबराव उत्तेकर व जेष्ठ सभासद आनंदा कोंडाजी शिंदे यांनी मोलाची कामगिरी बजावली. यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
यावेळी संचालक मंडळ सर्वश्री  पुंजा भवारी , किसन शिद, गंगुबाई वारघडे, बच्चु पारधी, गोविंद भरीत, शिवाजी पोरजे , अशोक केदारे, हिरामन करवंदे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या