दरेगाव येथे उसाच्या शेताला आग लागल्याने संपूर्ण शेतातील उस जळाल्याने पगार यांचे मोठे आर्थिक नुकसान
दरेगांव ता. ७- चांदवड तालुक्यातील दरेगांव येथे काल दिनांक६ला साखरबाई गोविंद पगार यांचे मालकी हक्काचे शेत गट क्रमांक ४१९ मध्ये गुरांसाठी चारा म्हणुनलागवड केली असता अचानक(नैसर्गिक) उसाच्या शेताला आग लागल्याने संपूर्ण शेतातील उस जळाल्याने पगार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उसाला पाणी भरण्यासाठी पी व्ही सी पाईपची पाईप लाईन टाकलेली होती. सदर उसाला आग लागल्याने पाईप जळाले. उसाला आग लागल्याने पगार यांचे उसाचे ४०००० हजार व पाईपचे ७५०० असे एकुण सत्तेचाळीस हगार पाचशे रुपायाचे नुकसान झाले.

दरेगांव ता. चांदवड येथे साखराबाई पगार यांच्या उसाच्या शेताला आग लागल्याने पंचनामा करतेवेळी कृषी सहाय्यक निरभवणे,सरपंच,पोलीस पाटिल व शेतकरी
यावेळी पंचनामा कृषी सहाय्यक अधिकारी निरभवणे यांनी पंचनामा केला. सरपंच अमोल देवरे,पोलीस पाटील समाधान गांगुर्डे,सोमनाथ देवरे,विक्रम पगार,माधव पगार यावेळी उपस्थित होते.
काल अचानक आलेल्या वादळि वारा व पावसासह कानिफनाथ महाराज मंदिराजवळलाईट पोल पडुन विज तारा तुटल्याने रात्र ग्रामस्थांना अंधारात काढावी लागली. अचानक आलेल्या वादळ व पावसाने शेतकऱ्यांची शेती माल झाकण्यासाठी तारांबळ उडाली.

दरेगांव ता. चांदवड येथे साखराबाई पगार यांच्या उसाच्या शेताला आग लागल्याने पंचनामा करतेवेळी कृषी सहाय्यक निरभवणे,सरपंच,पोलीस पाटिल व शेतकरी

