[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन भाजपा वतीने साजरा..

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिन भाजपा वतीने साजरा..

शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह चांदवड येथे आज क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिना निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन भाजपा आदिवासी मोर्चा व शहर भाजपा चांदवडचे वतीने करण्यात आले.

यावेळी चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भुषण कासलीवाल व जिल्हा नेते मोहन शर्मा यांनी वसतीगृहाची पाहणी केली. भाजपा आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या….
पाहणी दरम्यान वसतीगृहात कमालीची अस्वच्छता व अनेक खोल्यांचे दरवाजे मोडलेल्या स्वरूपात निदर्शनास आले. सौचालयातील अस्वस्थता व विजेच्या वायर मोकळ्या अवस्थेत आढळल्या तसेच वसतीगृहात अनेक दिवसांपासून पिण्याचे व वापराचे पाणी बंद आहे , याविषयी विचारणा केली असता जीवन प्राधिकरणाचे पाईप लाईन कित्येक दिवसांपासून फुटल्याचे समजते तसेच आतील व बाहेरील परिसरात फारच अस्वच्छ असल्याचे आढळले , सर्वात महत्वाची बाब म्हणजे वसतीगृहाकडे जाणारा रस्ता एकखाद्या जंगलातील मातीचा रस्ता वाटाव्या अशी दूरावस्था झाली आहे…. नुकतेच १२ वी चे निकाल लागल्याने नविन प्रवेश व्हायच्या आत वसतीगृहात सर्व सुविधा पूर्ववत व्हाव्यात अशी सूचना यावेळी कासलीवाल यांनी दिल्या , व शासकीय स्तरावरील काही मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत क्रांतीसूर्य जननायक भगावान बिरसा मुंडा स्मृतिदिन निमित्त अभिवादन करण्यात आले. वसतीगृहाचे अधिक्षक हितेंद्र राठोड यांनी आभार मानले.
यावेळी भुषण कासलीवाल , मोहन शार्मा , महेश खंदारे , संजय पाडवी , विशाल ललवाणी , किशोर क्षत्रिय , तुषार झारोळे , रूपेश पवार , नितिन फंगाळ , इ. भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या