राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धानदिनानिमित्त राज्याचे मंत्री-अन्न, नागरी पुरवठा व छगनरावजी भुजबळ यांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धानदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होतो. १९९९ ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर पार्टीचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणुन मला जबाबदारी मिळाली होती
पक्ष संघटना मजबुत करण्याचे मोठे काम आम्ही महाराष्ट्रभर फिरुन कार्यकर्त्यांच्या जोरावर केले. अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी महाराष्ट्रात नेहमीच पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे अशी आठवण सांगतानाच. देशात सर्व प्रश्नाची जाणं असणारे आणि प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडणारे नेते म्हणजे आदरणीय शरद पवार आहेत त्यामुळे विचारांची पक्की बैठक असणारे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच जण काम करत आहोत. महाराष्ट्र नेहमीच पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आहे त्यामुळे आगामी काळात देखील प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने पक्ष विस्तारासाठी काम करावे असे आवाहन करत सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या….

