एम. व्ही. पी. साठी चांदवड तालुक्यात सर्वाधिक मतदान
चांदवड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (Maratha Vidyaprasark Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या २४ जागांसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2017 साठी नाशिक जिल्ह्यात 95 टक्के मतदान झाले तर चांदवड तालुक्यात 98 टक्के मतदान झाले आहे संस्थेचे एकूण दहा हजार 197 मतदारापैकी 9680 मतदारांनी सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला चांदवड तालुक्यात 684 मतदारांपैकी 668 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख दिवसभर मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून बसले होते त्यामुळे सभासदांचा कॉल कौल नेमका कोणाला मिळतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात जोरदार चुरशीची शक्यता आहे जिल्ह्यात चांदवड तालुक्यात सर्वाधिक मतदान झाल्याने नेमके हे मतदान कोणाच्या पारड्यात पडते हे आता मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे . चांदवड तालुक्यात प्रगती पॅनल तर्फे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव व परिवर्तन पॅनल तर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे .मात्र जिल्ह्यात कोणता पॅनल येईल त्याच्यावर यांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. यावेळी आजी-माजी आमदारांसह सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांनी आपापल्या पॅनल साठी आपल्या समर्थक सभासदांकडे मते मागितली .मात्र सभासदांचा कौल कोणाला हे महत्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्ह्यात एकूण ५३ बूथवर मतदान झाले. या निवडणुकीसाठी संस्थेचे १० हजार १९७ सभासद होते. यापैकी ९ हजार ६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
कार्यकारी मंडळासाठी ९४.९३ टक्के तर सेवक सभासदासाठी ८८.३४ टक्के असे एकूण ९४.६४ टक्के विक्रमी मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान चांदवड तालुक्यात ९८.१० टक्के झाले आहे. तर सर्वात कमी नाशिक शहर ८७.३३ टक्के मतदान झाले आहे. 
कार्यकारी मंडळासाठी इगतपुरीत एकूण १३८ मतदार आहेत त्यापैकी १३२ मतदारांनी मतदान केले आहे. तर कळवण व सुरगाणा ३४८ पैकी ३२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. चांदवड मध्ये ६८४ पैकी ६६८ मतदारांनी मतदान केले. दिंडोरी व पेठ येथे ८३८ पैकी ८१३ सभासदांनी मतदान केले आहे.
नाशिक शहर ८७६ पैकी ७६५ तर नाशिक ग्रामीणमध्ये ७०७ पैकी ६६७ इतके मतदान झाले आहे. निफाडमध्ये २९०३ पैकी २८०४ इतके मतदान झाले. नांदगाव व सटाणा अनुक्रमे २९२ व १४१६ पैकी २७३ व १३३५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर मालेगावमध्ये ७८३ पैकी ७२६ तर येवला २०२ पैकी १९३ आणि सिन्नरमध्ये ४८३ पैकी ४२५ मतदान झाले आहे. देवळामध्ये ५६७ पैकी ५५० सभासदांनी मतदान केले. एकूण १०, १९७ सभासदांपैकी ९ हजार ६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कार्यकारी मंडळासाठी एकूण ९४.६४ टक्के मतदान झाले आहे.
तसेच ४६३ सेवक सभासदांपैकी ४०९ सभासदांनी मतदान केले आहे. सेवक सभासदासाठी ८८.३४ टक्के मतदान झाले आहे.

