राहुल येवला “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित
चांदवड:- लाडशाखीय वाणी समाज मित्र मंडळ संचालित प्रोत्साहन फाउंडेशन,महाराष्ट्र या राज्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेमार्फत समाजातील विविध समाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत समाजमनांचा, समाज सेवकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी “राज्यस्तरीय समजभूषण पुरस्कार” दिला जातो.
“समाजातील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने” एस.एन.जे.बी संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे योग प्रशिक्षक तसेच योग विद्या धाम, चांदवडचे योग प्रशिक्षक व केंद्रप्रमुख राहुल (अंबादास) भिला येवला यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सदर दैदिप्यमान सन्मान सोहळा पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे मोठया उत्साहात नुकताच संपन्न झाला.
योग प्रशिक्षक राहुल (अंबादास) भिला येवला यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून योगाद्वारे समाजाच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय कार्य व भरीव योगदान दिल्याबद्दल सदर प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती येवला यांना जोडीने साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. सौ.मंजुळाताई गावित, नाशिक मर्चंट बॅंकेचे उपाध्यक्ष सहकार महर्षी मा. आबासाहेब श्री अशोकजी सोनजे, प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश वाणी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
योग प्रशिक्षक राहुल येवला व स्वाती येवला यांचा “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करताना आमदार मा. सौ.मंजुळाताई गावित, सहकार महर्षी व नाशिक मर्चंट बॅंकेचे उपाध्यक्ष अशोकजी सोनजे, प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश वाणी आदी मान्यवर
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद समाज अध्यक्ष श्री राजेंद्रजी वाणी व पिंपळनेर येथील श्री लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष श्री.दादासाहेब जयवंतजी लक्ष्मण बागड, प्रोत्साहन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. दादासाहेब गिरीशजी वाणी सर, जळगांव जिल्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख गजाननजी मालपुरे साहेब , श्री.गावित सर, प्रोत्साहन फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री.दादासाहेब आर.एल.वाणी सर (नासिक),जेष्ठ सल्लागार श्री.दादासाहेब शरदजी नेरकर (नामपूर) तसेच प्रोत्साहन फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, नासिक येथील भटाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.बी.एस.वाणी सर, विरगावकर वाणी मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.जितेंद्र बापू कोठावदे, सन्मित्र मंडळाच्या संचालिका सौ.प्रतिभा वाणी, सहकारी मित्र श्री.प्रकाशजी येवले, उन्नती एज्युकेशन सोसायटी शिक्षक वृंद, पिंपळनेर येथील मान्यवर समाजबांधव, भगिनी, तसेच विविध ठिकाणाहून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल एस.एन. जे.बी. संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्थ, पदाधिकारी व कर्मचारी तसेच विविध योग संस्थेतील पदाधिकारी, योग शिक्षक, योग साधक आणि मित्र परिवाराकडून राहुल येवला यांचे अभिनंदन होत आहे.


