चांदवड चे पुरातन दगडी बांधणीचे श्री. रेणुका देवीचे मंदिर नवरात्र उत्सवासाठी सज्ज…
विक्रम देवरे – चांदवड (प्रतिनिधी) : – निसर्गरम्य वातावरणात हिरवाईने नटलेल्या परिसरात देवीचे मंदिर जिथे आहे तो सर्व परिसर घनदाट झाडीने बहरलेला आहे. रेणुका देवीच्या मंदिराबाहेरच्या पटांगणातून डाव्या बाजूला चंद्रेश्वरीचा डोंगर आहे. तिथे पाण्याचा एक मोठा धबधबा सर्वांनाच आकर्षित करीत असतो. उजव्या बाजूला डोंगराचे अतिसुंदर इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण दिसते. चित्रपट निर्मात्यांनाही हा निसर्गरम्य परिसर नक्कीच मनाला भावेल असा. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ आणि ‘जय रेणुका’ या चित्रपटात चांदवडच्या देवीजवळील या दोन्ही डोंगरांच्या परिसरात चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र, हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता केवळ चित्रपटातच नाही तर प्रत्येक्षात नक्कीच अनुभवता येईल असे दृश्य आजही येथे आहे.

देवीचे मंदिर जुन्या दगडी बांधणीचे आहे. आतमध्ये फरशी व शेड वगळता सगळे बांधकाम अहिल्यादेवींच्याच काळातले असून अनेक नुतनी करण्याचे काम झाले आहे तेही जुन्या पद्धतीने. दगडी प्रवेशद्वार, ५० पायऱ्या, मंदिराच्या आवारात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी दीपमाला ही सगळी दौलत अभिमानाने मिरवत रेणुकामातेचे मंदिर चांदवडमध्ये डौलाने उभे आहे. हे मंदिर म्हणजे चांदवड शहराचे वैभव आहे. या मंदिराशिवाय चांदवड येथे कालिका, तसेच महालक्ष्मी अशी दोन मंदिरे असून, नवरात्रीत या दोन्ही ठिकाणीही भाविकांची गर्दी दिसून येते.अश्या या निसर्गरम्य वातावरनात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी झाली असून भाविकांनी गेल्या दोन वर्षात कोरोणा काळ असल्यामुळे जे भाविक देवीला नतमस्तक होण्यासाठी आले नाही. त्यांची दर्शनासाठी नक्कीच गर्दी दिसून येईल. नासिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक भाविक येतील अशी इच्छा चांदवडकरांच्या मनातून व्यक्त होताना दिसून येत आहे.

मंदिरात असलेले देवी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिकृती मूर्त
या काळात रोज सकाळी अभिषेक,सकाळ सायंकाळ आरती, पोवाडा,पालखी,याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे चार वाजता महा अभिषेक नऊ वाजता पालखी मिरवणूक सकाळी 11 ते 12 या दरम्यान घटस्थापना उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते व रात्री आठ वाजता चांदवड दिवाणी व फौजदारी न्यायालय न्यायाधीश यांच्या प्रमुख हस्ते महाआरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जवळच असलेले पुरातन इच्छापूर्ती गणेश मंदिर


भाविकांना अतिशय सोईस्कर दर्शनाची सोय उपलब्ध होईल असे नियोजन करण्यात आलेले आहे. देवी मंदिर,अधिकारी, पोलीस प्रशासन व सर्व यंत्रणा भाविकांना सेवा देण्यासाठी सज्य झालेले आहे.रोज साधारणतः पन्नास हजारहून अधिक भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज वर्तवला जातो.