उत्तराखंड राज्यात घडलेल्या अमानवी घटनेच्या विरोधात चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटी तर्फे कॅन्डल मार्च काढून पिडीतेला श्रद्धांजली.
उत्तराखंड राज्यांमध्ये १९ वर्षीय तरुणी अंकिता भंडारी ची निर्घृण हत्या करण्यात आली त्यानंतर देखील स्थानिक भारतीय जनता पार्टीचे सरकार पिढीतील न्याय देण्याऐवजी आरोपीला मदत करत आहे या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटी तर्फे मनमाड लासलगाव चौफुली येथे कॅन्डल मार्च आयोजित करून निषेध व्यक्त करण्यात आला.


यावेळेस चांदवड तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिपांशू अरुण जाधव, खादीग्राम उद्योग संचालक तुकाराम शेठ कोतवाल,किरण ठाकरे,मयुरेश अहिरे,सागर अहिरे,कमलेश पवार,गोपी कोतवाल, धनंजय जाधव, आकाश पगार, विकास जाधव, पुष्पक गवळी, महेश अवताडे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते..


