नामको बँकेचा चांदवड शाखा स्थलांतर व ग्राहक मेळावा संपन्न..
नामको बँकेची प्रगती संचालक मंडळाच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच – शिरीषकुमार कोतवाल* दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक या बँकेच्या चांदवड शाखेचे नवीन जागेत स्थलांतर नूतन आशा प्रशस्त जागेवर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेद्वाराजवळच झाले असून ,तालुक्यातील सभासद व बँकेच्या ग्राहकांच्या उपस्थितीत चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन संपन्न झालं , तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे हे होते . नामको बँकेचे चेअरमन माजी आमदार वसंतभाऊ गीते , व्हा.चेअरमन व संचालक यांच्यातर्फे उपस्थित मान्यवर व सभासदांचा येथोचित सत्कार करण्यात येऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटन समारंभ नंतर झालेल्या बँकेच्या ग्राहक मेळावा व उद्घाटन समारंभ प्रसंगी नामको बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे यांनी प्रास्ताविक केले त्यावेळी त्यांनी बँकेचा संदर्भात सविस्तर माहिती देऊन बँकेचा आर्थिक लेखाजोखा सभासदांसमोर मांडला व उपस्थितांचे स्वागत केले . यावेळी उद्घाटक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,नामको बँक संचालक मंडळ अतिशय प्रामाणिकपणे कामकाज करनारे संचालक मंडळ असून बँकेच्या पाच हजार कोटीच्या ठेविंचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल. संचालक सुभाष नहार यांनी 21 वर्षांपूर्वी चांदवड शहरात नामको बँकेच्या शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते केले होते आज तोच योग मला 21 वर्षानंतर पुन्हा आला आहे या काळात बँकेने प्रचंड प्रगती केली असून बँकेचे नाव आज सहकार क्षेत्रात अग्रस्थानी आहे. बँक आता मल्टी स्टेट बँक झालीं आहे. असेही कोतवाल यांनी सांगितले. बँकेचे चेअरमन माजी आमदार वसंतभाऊ गीते यांनी सांगितले की, प्रशासकाच्या काळात बँकेचे एनपीएचे प्रमाण 38 टक्क्यांवर गेले होते, आज ते पाच टक्के पर्यंत खाली आले आहे , बँकेच्या सभासदांमुळे आम्हाला गत वैभव मिळाले आहे, असे चेअरमन वसंतभाऊ गीते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समिती माजी सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी नामकोने व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरू करावेत .व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे व्यवहार नामको बँके मार्फत करावेत असे डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले. संचालक सोहनशेठ भंडारी यांनी नामको कॅन्सर हॉस्पिटल बद्दल सविस्तर माहिती दिली, हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ बँकेचे सभासद व सर्वांनीच घ्यावा असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवरांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी चेअरमन वसंतभाऊ गीते माजी चेअरमन सोहनशेट भंडारी ,ज्येष्ठ संचालक सुभाषभाऊं नहार , रंजनभाऊ ठाकरे ,प्रकाश दायमा ,हेमंत धात्रक, विजय साने ,शोभाताई छाजेड ,रंजन जातेगावकर , दाढीवाल ,नरेंद पवार ,भानुदास चौधरी, अविनाश घोटी, कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित आदींसह संचालक उपस्थित होते. यावेळी भूषण कासलीवाल ,नितीनदादा आहेर, संजय जाधव, विलास भवर ,शांताराम ठाकरे , भीमराव जेजुरे, रघुनाथ आहेर, भाऊसाहेब शेलार,समाधान जामदार ,शिवाजी कासव , विजय जाधव , सुनीलतात्या कबाडे , शरद आहेर ,अनिल काळे, सुखदेव जाधव , अशोककाका व्यवहारे प्राध्यापक टी.पी. निकम, संदीप उगले, बाळासाहेब वाघ ,विलास दादा ढोमसे, राहुल कोतवाल ,राजकुमार संकलेचा ,दत्तात्रय वाकचौरे, शैलेश ठाकरे ,अनिल पाटील , ,जावेद कादरी, गोरख शिंदे ,शिवाजी आहेर, अण्णा आहेर ,दशरथ ठाकरे, कैलास कोतवाल ,आदित्य फलके, विक्रम देवरे , नंदकुमार कासलीवाल ,पारस डूगरवाल , पिंटू संचेती, गणेश निंबाळकर, शंभूराजे खैरे, भूषण पलोड , बद्रीशेठ जाधव ,मोहसीन शेख , आबा गांगुर्डे ,मार्केटचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, निलेश काळे ,यांच्यासह अनेक व्यापारी , तालुक्यातील बँकेचे ग्राहक सभासद, आदी उपस्थित होते.

