[masterslider id="2"]
क्रीडा जाहिरात मुख्य बातमी लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

आदिवासी संस्कृतीं मधील लोकतत्व व वैज्ञानिक दृष्टिकोन.

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी संस्कृतीं मधील लोकतत्व व वैज्ञानिक दृष्टिकोन.

आदिवासी संस्कृती ही निसर्ग संपन्न आहे डोंगराळ भागात वृक्षांच्या सानिध्यात राहून त्यांना पर्यावरण विषयक जाणिव आजही आहे त्या संस्कृतीचे रीतीरिवाज,रूढी परंपरा,हे जीवन पुर्वी पासून समाजाने घालून दिलेल्या नियमानूसार अगदी निखळ आणि साध्या पद्धतीने चालत आले आहे त्यांच्या जीवनात पुर्वीपासून लोकतत्व संकल्पना लोकांचे अनुभव प्रवाही आणि वैज्ञानिक भूमिका यांचे पुर्ण संदर्भ लोकगीतांचे सादरीकरण करतांना आढळतात ते खालील प्रमाणे आहे


आदिवासी समाजात विवाह (लग्न सोहळा) करताना हळद लावली जाते तशी ती इतर समाजातही लावली जाते हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हळद तेलात मिसळून अंगास लावल्याने त्वचा, चेहरा उजळून दिसतो हळद ही जंतुनाशक आहे त्वचेवरील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

■ विवाह सोहळ्याच्या मांडवात वेगवेगळ्या वनस्पतींच्या फांद्या वापरतात वनस्पती रोगप्रतिकारक शक्तीसंवर्धक व शोभेची वस्तू म्हणून आंबा जांभूळ, उंबर या झाडांच्या फांद्या पाण्याने भरलेल्या माठात खांबाला टेकून बांधून ठेवतात ते काम नवरी , नवऱ्याच्या मामाने करावयाचे असते या झाडांची पाने जंतुनाशक असतात त्या ठिकाणी कोणतीही माशी, डास किंवा इतर रोग जंतू हवेत पसरत नसतात ह्या झाडांच्या फांद्या गावातील कोतवालाने तोडून आनायच्या असतात व त्याचा लोक गीतांमध्ये उहापोह केलेला आढळतो.
उदा.
उंबरी फुलली धींडरी
भाकरी ये
ये sss
नका रडु आत्याजी
मायही बावरी ये
ये sss
आंब्याची डहाळी मंडपी
मंडपी सजली ये
ये sss
आदिवासी भागात तुळशी विवाह सोहळ्याच्या नंतर लग्न जमवले जाते अशी प्रथा आहे निसर्गातील आंबा,उंबर, जांभूळ हे सदाहरित वृक्ष नेहमीच प्रसन्न वातावरण निर्माण करतात त्याप्रमाणे अशा कार्यात आई वडीलांच्या डोळ्यात आनंद अश्रु गोठलेले असतात मुलामुलींच्या संसारात कायम प्रसन्नता शांतता टिकुन राहिली पाहिजे असा लोकगीताचा अर्थबोध होत आहे धींडरी भाकरी हा एक पदार्थ आहे धींडरी हा पदार्थ मकर संक्रांतीच्या सणापासून तांदळाच्या पीठाने बनवला जातो ती भाकरी उंबराच्या फळाप्रमाने अतिशय मऊ असते त्याच वेळी शीशीर ऋतूमध्ये उंबराला देखील रात्रीच्या वेळी फुलं येतात तसा उंबर हा बारमाही वृक्ष असल्याने फळही पीकतात

आदिवासी समाजात लोकनृत्य सादर करतांना लोकगीतांतून लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत गोलाकार रींगण करून नाचतात
त्यातून जणू पृथ्वीच्या परिवलनाचे दर्शन घडते
उदा ‌.
उंबर फुले उंबर फुले सळ
मदाने राती
किंवा
चांदाची चांदणी चमचम
चमकित होती गं
शेताच्या मळ्यात शेवंती फुलतं
होती गं
ही लोकगीतं वनस्पती आणि शेतीसंबंधी असली तरी विज्ञाननिष्ठ संबंध दर्शवतात

थाळी ह्या लोककलेमध्ये दोन व्यक्ती सहभागी असतात थाळी ही कला सादर करण्याची सुरुवात ही आदिवासी डोंगरदेव (भाया) पासून होते पौष महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो अशा वेळी शेतातील खरीप हंगामातील पीक काढून खळ्यात जमा झालेले असते ह्या कलेत गाणार पीतळाच्या परातीत ( तांबाण ) यात नदीच्या काठावर लव्हाळ वनस्पती आढळते तीची काडी कडक असते ती मेणाला टोचून त्याला घट्ट स्पर्श केल्यास विशीष्ट ध्वनी निर्माण होतो त्यावर थाळी गाण्याची कथा ताला स्वरात सादर केली जाते.

आदिवासी हे निसर्ग पुजक असल्याने आदिवासी भागात दर पाच वर्षांनी डोंगर माऊली कार्यक्रम साजरा केला जातो त्यात पावरी हे भोपळ्याची डवली व मोरपंखी पीसाने सजवलेले फुंक वाद्ये वाजवताना संमोहक आवाज बाहेर पडतो त्यामुळे कार्यक्रम साजरा करण्याची जागा त्याला आदिवासी भागात मठ म्हणतात ते वातावरण प्रसन्न व संमोहक आवाजात क्षणभंगुर झालेले असते

घांगळी तंतु वाद्ये हे डोंगर माऊली कार्यक्रम सादर करतांना वापरले जाते तंतु वाद्ये पीवळ्या बांबूपाचा टोकरला भोपळ्याच्या दोन डवल्या मेणाने घट्ट चिकटलेले असतात वरी टोचलेल्या भागाला घोड्याचा केस तानुन बांधलेला असल्याने कथा सादर करतांना स्पर्श केला की विशीष्ट ध्वनी निर्माण होतो कथा ही निसर्गाच्या सान्निध्यात झाडाझुडुपांमध्ये वसलेले शे़दुर लावून फासलेली दगडी स्थनकं डोंगराळ भागात वृक्षांच्या सानिध्यात कड्याकपारीत वसलेली अमक्या तमक्या नावाने स्थापन झालेली माऊलीच्या नावाने सादर केली जाते

निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराळ भागात मनसोक्त विनातक्रार जीवन कंठणाऱ्या आदिवासी बांधवांचा निसर्गातील रान भाज्यांचा आहारात जास्त वापर केला जातो कारण रानभाज्या ह्या बीन खतांच्या असल्याने रोगप्रतीकार शक्ती वाढते

■ निसर्गाच्या सान्निध्यातील प्राण्यांच्या बाबतीत विज्ञाननिष्ठ संदर्भ आढळतात
होळी सण हा वसंत ऋतूत साजरा केला जातो त्यावेळी झाडाची पालवी गळायला सुरुवात होते आणि नविन कोंभ भरुन येतात
अशा वेळी होळी सण आदिवासी भागात साजरा केला जातो तेव्हा गीत म्हटली जातात
उदा.
होळे बाई तु होळे वं सदा
शीमगा खेळं वं
किंवा
दाब दरवड दे पाटी खरवड
अठली बाई कोठ चाटू मोडून
रागा गेली
सशाची रसा भगरीत कसा

सश्याची रशी भगरीत खाल्ली तर भगर पचायला हलकी असते आणि ससा जंगली पशू असल्याने
जंगलातील अनेक वनस्पती खात असतो त्याची रसी भगरीत खाल्ली पाहिजे असे पुर्वीपासून चालत आलेले लोकतत्त्व आहे

खरे तर आदिवासी लोकगीत ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत त्यात लोकत्त्वीय व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन पण तीतकाच महत्वाचं आहे

सुभाष नारायण कामडी
(संशोधक)

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या