[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव व जि. प. प्राथमिक कन्याशाळा येथे वाचन प्रेरणा दिन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव व
जि. प. प्राथमिक कन्याशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी जि. प. प्राथमिक कन्याशाळा वडनेरभैरव ता चांदवड येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव चे सरचिटणीस श्री चंद्रकांत भंडारे व ग्रंथपाल श्री अनिल पवार, मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्री. चंद्रकांत भंडारे यांनी विध्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावून सांगितले. वाचन संस्कृती जोपसण्यासाठी विविध पुस्तकं वाचावीत यासाठी सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे विविध पुस्तकं उपलब्ध असून सर्व विध्यार्थ्यानी सदर पुस्तके वाचनाचा नियमित आनंद लुटावा असे आव्हान केले.

कार्यक्रनाचे सूत्रसंचालन श्री संजय सोनावणे यांनी केले. आभार श्री नितीन गुरव यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विध्यार्थी, तशेच शिक्षक वर्ग श्रीम. रंजना त्रिभुवन, श्री विलास सोनवणे, श्रीम मनीषा पाटील, श्रीम. बी. एल. गायकवाड त्याचप्रमाणे वाचनालय कर्मचारी श्री माधव पाचोरकर, श्रीम संध्या खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या