[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

राहुल येवला यांचे राज्यस्तरीय योगासन क्रीड़ा स्पर्धा पंच परीक्षेत यश व निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राहुल येवला यांचे राज्यस्तरीय योगासन क्रीड़ा स्पर्धा पंच परीक्षेत यश व निवड

नाशिक:- भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त नॕशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पंच रिफ्रेशर कोर्स आणि जिल्हास्तरीय पंच प्रशिक्षण शिबिर दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात आले. सदर कार्यशाळा आॕनलाइन आयोजित करण्यात आली तसेच यात राज्यस्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय योग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय योगपटू अंबादास (राहुल) भिलाजी येवला यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यामधे अनुभवी योग प्रशिक्षक व व्यावसायिक योगपटू यांची निवड करण्यात आली. पात्रता धारकांनी आॕनलाईन लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा दिली. ज्या पात्रता धारकांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले त्यामधून अंबादास (राहुल) भिलाजी येवला यांची राज्यस्तरीय योगासन क्रीड़ा स्पर्धा पंच (स्टेट योगासन स्पोर्ट्स कॉम्पिटिशन जज) म्हणून निवड करण्यात आली.
या उपक्रमात महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र पडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष सतीश मोहगावकर डॉ.रमेश मंत्री, राष्ट्रीय पंच, राजेश पवार,निलेश पठाडे, जिल्हा समन्वयक पी.बी. नरवाडे, तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, मोहन कवठेकर, डॉ. तस्मिना शेख यांनी मार्गदर्शन केले.
राहुल बी. येवला यांच्या यशाबद्दल एसएनजेबी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपध्यक्ष व समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, प्रबंध समितीचे सहमानद सचिव व समन्वयक झुंबरलाल भंडारी, तसेच संस्थेचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. आर. जी. तातेड, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गाळणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम .आर. संघवी,यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस.डी. संचेती, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या