साहित्यिकांनी साहित्यिक आंधळेपण टाळावे – प्रा शिरीष गंधे
चांदवड येथील चांदवडी रुपय्या प्रतिष्ठान संचलित चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा पुरस्कार वितरण व वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कवी शिरीष गंधे यांनी “साहित्यिकांनी साहित्यिक आंधळेपण टाळावे व सामाजिक संस्थांनी सामाजिक बहिरेपण टाळावे” असे प्रतिपादन केले. तसेच ग्रामीण भागातील साहित्य विषयक प्रेरणा जागवणारी ही चळवळ आणि त्यांचे उपक्रम विशेष दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन अभिनव खानदेश मासिकाचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रा. शिरीष गंधे, पत्रकार प्रभाकर सुर्यवंशी, डॉ. राजेंद्र मलोसे, जेष्ठ समीक्षक डॉ तुषार चांदवडकर, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, सचिव सागर जाधव जोपुळकर, अध्यक्ष रावसाहेब जाधव हे उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळाचा वार्षिक समारंभ संपन्न झाला. यासाठी उपस्थित मान्यवरांचा परिचय संदीप गुजराथी, रूपा जाधव आणि सविता दरेकर यांनी करून दिला.
यावर्षीचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार चांदवड येथील “अश्वमेध प्रतिष्ठान” या सामाजिक कार्य करणाऱ्या समूहास प्रदान करण्यात आला, तर साहित्य प्रेरणा पुरस्कार गझलकार संजय गोरडे उर्फ कवी सौभद्र यांना प्रदान करण्यात आला.
कवी जनार्दन देवरे यांनी मानपत्रांचे वाचन केले तर कवी रवींद्र देवरे यांनी निवड समितीचे कार्य आणि निकष याविषयी उपस्थितांना माहिती दिली. अश्वमेध प्रतिष्ठान तर्फे सुप्रसिद्ध कवी विष्णू थोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कवी संजय गोरडे यांनी आपल्या काव्यरचना सादर करून साहित्य विषयक आपला प्रवास विशद केला.
या कार्यक्रमात प्रसिद्ध स्तंभलेखिका सविता दरेकर लिखित ‘काळजातला लामनदिवा’ या कादंबरीचे प्रकाशन पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कवी शिरीष गंधे, डॉ तुषार चांदवडकर व डॉ मलोसे यांनी कादंबरी वर भाष्य केले.
यासोबतच संपादक विक्रम देवरे यांच्या साप्ताहिक ग्रामचैतन्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले…
मंडळातर्फे स्व. एन. के. पाटील स्मृतीप्रित्यर्थ आयोजित काव्यलेखन घेण्यात आलेल्या कवितालेखन स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ. तुषार चांदवडकर यांनी काव्य लेखन स्पर्धेच्या परीक्षणाबाबतचे निकष व त्यानुसार केलेली कवितांची निवड याविषयी सूचक असे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत खुल्या गटात प्रथम – तुकाराम सिताराम ढिकले, द्वितीय – प्रमोद शंकर चिंचोले, तृतीय – प्रतिभा सुरेश खैरनार, उत्तेजनार्थ ज्ञानोबा त्रिंबक ढगे, संगीता मधुकर महाजन, अजय बिरारी, तसेच बालगटात प्रथम – प्रांजल योगेश गांगुर्डे, द्वितीय – पूजा बापू जाधव, तृतीय – तेजस्विनी सचिन आहेर, उत्तेजनार्थ – दीक्षा बाबाजी गांगुर्डे, वैष्णवी दिलीप माळी, यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल केदारे, प्रफुल्ल सोनवणे, वाल्मिक सोनवणे, संदीप गुजराथी, जनार्दन देवरे, नितीन शिंदे, विक्रम देवरे, करण सोनी, अजित जाधव, भागवत मांदळे, उदय वायकोळे, अविनाश वाघ, बाळकृष्ण जाधव, सविता दिवटे, माया ठोके, किशोर बेलदार, अर्जुन भवर, अक्षता देवरे, शीला पाटील, शैलजा जाधव आदी प्रयत्नशील होते.
कार्यक्रम प्रसंगी अश्वमेध प्रतिष्ठानचे सदस्य किशोर निवृत्ती बेलदार, सतीश निंबा वाघ, अर्जुन परसराम भवर, योगेश गुजराती, कवी विष्णू थोरे,
अड. शंतनु गांगुर्डे यांच्यासह अनेक कला रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी केले.


