[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पंढरपुर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठया उत्साहात संपन्न

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

पंढरपुर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठया उत्साहात संपन्न

या सप्ताह सोहळ्यात भागवत भूषण पुरस्कार 2022 चे मोठया दिमाखात वितरण

आडगाव रेपाळ (वार्ताहर ):—दरवर्षी देशभरातील वेग वेगळ्या राज्यात असलेल्या तिर्थस्थळी अखंड हरिनाम सप्ताह घेण्याची परंपरा गेल्या एकविस वर्षापुर्वी सुरू करुन या वर्षी जगताप महाराजांचा हा सप्ताह श्री गोपाळ महाराज संस्थान,गोपाळपूर, विष्णुपद ,श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला . या सप्ताहात महाराष्ट्र राज्यातील अनेक संत ,महंतांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले, तसेच या वेळी यंदाचा मानाचा भागवत भूषण पुरस्कार वारकरी प्रबोधन महा समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य ह.भ.प. श्री रामेश्वर महाराज शास्त्री यांना देण्यात आला.अशी माहिती श्री क्षेत्र चारधाम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष व सप्ताह आयोजक ह.भ.प. अंबादास महाराज जगताप यांनी एका पत्रान्वये दिली.

गेल्या एकविस वर्षापुर्वी श्री वारकरी संप्रदायाची पताका घेऊन श्री गुरुनिवृत्तीनाथांच्या चरणाशी श्री क्षेत्र त्रंबक येथे सात दिवस सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या नंतर दरवर्षी हा सप्ताह राज्याबाहेर साजरा झाला. त्रिंबकेश्वर नंतर हरिद्वार, वाराणसी, उज्जैन, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथपुरी, वृंदावन, कुरुक्षेत्र, चित्रकूट, ऋषिकेश , नैमिषारण्य येथे सप्तसप्ताहाची तपोपुर्ती झाली. त्या नंतर पुष्कर, द्वारका, रामेश्वर प्रत्येक क्षेत्राची दुरुक्ती झाली. परंतु महाराजांचे मनाला समाधान होत नव्हते श्री गुरुंचा आशिर्वाद पुढेही बहुत करणे आहे, अदृश्यवशात दिशा दाखवित होता. तीन वर्षापुर्वी अंदमानच्या सप्ताहाचा संकल्प केला होता, तो प्रभुकृपेने सिद्धीस गेला म्हणून पहिले महाराष्ट्र बाहेर सप्ताह नियोजन आणि आता विठुरायाची नगरी पंढरीत सप्ताह मोठया उत्साहात साजरा झाला.

समस्त वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेले दैवत विठ्ठल रखुमाई यांच्या पवित्र पंढरपुर नगरीत अर्थात तीर्थ,क्षेत्र आणि देव अशा त्रिवेणी संगम स्थळी वारकरी संप्रदायाची प्रचार – प्रसार करणे कामी संपन्न झाला. सप्ताहात दररोज सकाळी चार ते सहा काकड आरती, सकाळी नऊ ते बारा श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी बारा ते एक संत भोजन ,दुपारी एक ते चार विश्रांती ,दुपारी चार ते पाच हरिपाठ, रात्री सात ते नऊ कीर्तन ,रात्री नऊ ते दहा संत भोजन याप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले तसेच ह भ प शिवाजी महाराज गायके,ह भ प वैभव महाराज शेटे, ह भ प योगेश महाराज गायकवाड, ह भ प जालिंदर महाराज आचलगावकर,खानदेश रत्न वैराग्यमूर्ती ह भ प तुकाराम महाराज जेऊरकर,ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री, ह भ प नामदेव महाराज चव्हाण यांचे कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमास भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहीती श्री क्षेत्र चारधाम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष व सप्ताह आयोजक ह.भ.प. अंबादास महाराज जगताप यांनी दिली.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या