[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सरपंचांचे अधिकार काढून घेण्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनासाठी चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची चांदवड येथे शुक्रवारी बैठक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सरपंचांचे अधिकार काढून घेण्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनासाठी चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची चांदवड येथे शुक्रवारी बैठक

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरित करण्याचे सरपंचांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी घेतल्याचा विरोधात तिव्र आंदोलन करण्यासाठी चांदवड येथे शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक दि.20/01/2023 रोजी सकाळी 10:00 वाजता शासकीय विश्रामग्रुह,चांदवड येथे आयोजित केली आहे, सदर बैठकीत या निर्णया विरोधात तिव्र आंदोलन करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येईल तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सरपंच सर्वश्री ह.प.भ. संजयमहाराज शिंदे,योगेश ढोमसे,श्रीहरी ठाकरे,दर्शन अहीरे व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय(आबा)गांगुर्डे, सरपंच डॉ. स्वाती भावराव देवरे, पंकज दखणे ,सरपंच सरला पवार, सरपंच आत्माराम खताळ, ग्रामपंचायत सदस्य वैशाली विक्रम देवरे , संजय जाधव, सरपंच गोकुळ वाघ, उपसरपंच संदिप जेजुरे , रमेश सोमासे,यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या