राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मेसनखेडे गणातील वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती चांदवड याच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) महाराष्ट्र राज्य, यांच्या संयुक्त विद्यमाने”आमचं गांव, आमचा विकास ” (GPDP) राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान सनः २०२२-२३ अंतर्गत वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी शाश्वत विकास ध्येय (SDG) स्थानिकीकरण या विषयाचे गणस्तरीय मेसनखेडे गणातील २ दिवसीय प्रशिक्षण / कार्यशाळा दत्ताचे शिंगवे ( मेसणखेडे खुर्द) येथे संपन्न झाले.
युनो या जागतिक संघटनेने मानव जातीच्या विकासासाठी सतरा उदिस्टे निश्चित केली आहे ती भारताने स्वीकारले आहे. शाश्वत विकास महत्त्वाचा आहे तात्पुरती कामे न करता ती दीर्घकालीन उपयोगाची होणे गरजेचे आहे , त्यातील नऊ संकल्पना व्यवहारिक रूपात आणणे आवश्यक आहे , ग्रामपंचायतिने सध्या जलसमृद्ध गाव स्वच्छ हरित गाव या दोन थीम वर आता काम करायचं आहे. विकासाचे काम करणारी जिल्हा परिषद सारखी मोठी यंत्रणा नाही , त्यामुळे प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी चांगले लक्ष देऊन शासनाचा वेळ व पैसा सत्कारणी लावावा असे मनोगत चांदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी यावेळी बोलताना केले आहे.
विस्तार अधिकारी किशोर लोहार यांनी सांगितले की , थिमॅटिक आराखडा करणे गरजेचे असून २०२३- २४ चा आराखडा बनवताना जलसमृद्ध गाव व स्वच्छ हरित गाव या दोन थीमवर आराखडा बनवावा, त्यासाठी 60 टक्के बंधित निधी व 40 टक्के अबंधीत निधी या प्रमाणात आराखडा निवडताना शासनाने केलेल्या मार्गदर्शक व सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आराखडा बनवावा,
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत प्रविण प्रशिक्षक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदवड किशोर लोहार यांनी दोन दिवस आराखडा तयार करताना करवाच्या विविध बाबी थीम समजावून सांगितल्या. आर बी. लोखंडे , प्रवीण प्रशिक्षक ए.न. म , ,श्रीमती सुनील एलिंजे,निमोन सरपंच डॉ. स्वाती देवरे , सरपंच डोनगाव गोकुळ वाघ, सरपंच वाद प्रवीण आहेर, सरपंच शिंगवे आत्माराम खताळ, सरपंच दरेगाव सरला पवार, मेसणखेडे सरपंच संतोष माळी,सरपंच कोकणखेडे संदिप नारायण शिंदे , सरपंच कांनडगाव विकास पवार, दहेगाव ग्रामसेवक के.सी आहिरे, ग्रामसेवक डोनगाव विशाल सोनवणे, ग्रामसेवक दरेगाव, वाद एम.आर.डांगरे , ग्रामसेवक मेसनखेडे शशिकांत अहिरे, नीमोन ग्रामसेवक श्रीमती सी. डी. ठाकरे,दहेगाव ग्रामसेवक के.सी आहिरे, कांनडगाव ग्रामसेवक अण्णासाहेब सोमवंशी, भाऊराहेब निकम , दरेगाव मुख्याध्यापक जनार्दन देवरे , शिंगवे श्री गवळी सर,श्रीमती पवार मैडम , श्री काळे सर , श्री किशोर ठोंबरे, ,एंडाईन सर-
सोमनाथ गांगुर्डे सर – , उपसरंपंच मेसणखेडे संकेत पगारे, उपसरंपंच डोनगाव संदिप जेजुरे, उपसरपंच दरेगाव सोमनाथ देवरे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खताळ,वैशाली देवरे,सोनाली देवरे, नितिन पगारे भाऊसाहेब जाधव, निवृती आहिरे , संतोष माळी, कल्पना पगारे, सागर मार्कंड, आनंद पगारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरपंच यांच्या वतीने डॉ. स्वाती देवरे यांनी मनोगत व्यक्त केले, कवी जनार्दन देवरे यांनी कविता सादर केली, तर आभाप्रदर्शन कूर्षी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पंढरीनाथ खताळ यांनी केले. यावेळी मेसणखेडे गणातील विविध गावचे सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बचत गटाचे अध्यक्ष ,आशा वर्कर्स उपस्थित होते .

