[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महागाईच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारचा व शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून कांद्यास हमीभाव द्यावा. या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रांत कार्यालय चांदवड येथे निदर्शन करून निषेध आंदोलन करुन प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले


यावेळी कांद्यास हमीभाव मिळालाच पाहिजे, कमी दरात खरेदी करण्यात आला असून सदर कांदयास 1000 रु प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे झालेच पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे.शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला व कांद्यास अनुदान जाहीर करावे मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिनदादा आहेर ,तालुकाप्रमुख विलास भवर,शहरप्रमुख सदीप उगले ,तालुका संघटक केशव ठाकरे ,महिला आघाडी संघटीका रौशनी कुंभारडे,गुड्डू खैरणार ,सागर बर्वे ,संजय गांगुर्डे,गटप्रमूख कैलास देवरे ,उपतालुका प्रमुख, रवि काळे, अशोक शिंदे, दत्तु शेळके, संतोष मोहन,
युवासेना तालुकाअधिकारी रोहित ठाकरे,मा सरपंच राजू ठाकरे, वसंत सानप, संजय गांगुर्डे, वसंत सानप, निवृत्ती कुंभार्डे, माजी सरपंच रवींद्र पुरकर, शंकर पूरकर, सौरभ देशमाने, सुनील बागुल, शभूराजे खैरे, निलेश ठाकरे, सागर जगताप, राजेंद्र ठाकरे, संदिप साठे, परशराम शिंदे , माजी जिल्हापरीषद सदस्य, दादाभाऊ अहिरे, नाना धनाईत,
गट प्रमुख, गणप्रमुख , बूथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या