चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संजय जाधव तर उपसभापतीपदी कारभारी आहेर.
चांदवड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चांदवड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय दगुजी जाधव तर उपसभापती पदी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी नाना आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

सभापती निवडी नंतर जल्लोष साजरा करताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सभापती निवडीसाठी तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांना मार्केट कमिटीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी सहाय्य केले.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. सभापती पदासाठी महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव तर प्रतिस्पर्धी गटातर्फे पंढरीनाथ खताळ यांचा अर्ज दाखल झाला होता . तसेच उपसभापती पदासाठी महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेचे कारभारी आहेर तर प्रतिस्पर्धी गटातर्फे सुखदेव जाधव यांचा अर्ज दाखल झाला. अर्ज माघारी नंतर पंढरीनाथ खताळ व सुकदेव जाधव यांनी माघार घेतल्याने सभापतीपदी संजय जाधव तर उपसभापती पदी कारभारी आहेर यांची बिनविरोध निवड झाली.
सदर बैठकीस संचालक शिरिषकुमार कोतवाल ,डॉ.सयाजीराव गायकवाड ,नितीनदादा आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, विक्रमबाबा मार्कंड, सचिन अग्रवाल, डॉक्टर वैशाली जाधव, मीनाताई शिरसाट, गणेश निंबाळकर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, वाल्मीक वानखेडे, योगेश ढोमसे, रविंद्र पवार, सुशील पलोड हे उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापती संजय दगुजी जाधव उपस्थितांना संबोधित करताना
यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल आनंद उत्सव साजरा केला. निवडी नंतर झालेल्या अभिनंदन सोहळ्यात भिमराव जेजुरे, शिवसेनेचे विलास भवर, डॉ. राजेंद्र दवंडे, कारभारी आहेर, संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार सुभाष जाधव यांनी मानले. याप्रसंगी आघाडीचे काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

