[masterslider id="2"]
लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग – ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” महिला सन्मान पुरस्कार 

यांनी लिहिलेले रावसाहेब जाधव

आरोग्य व व्यसनमुक्ती विषयावर सामजिक जनजागृती आणि कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थी सौ. रोहिणी भागवत मांदळे यांच्या कामाचा विशेष गौरव झाल्याने पंचक्रोशीत आनंद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग – ग्रामपंचायत स्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” महिला सन्मान पुरस्कार 

 

नारायणगाव ता.चांदवड (नाशिक) तर्फे नुकतेच अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्ताने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” महिला सन्मान पुरस्कार वितरीत करण्यात आले. आरोग्य व व्यसनमुक्ती विषयावर सामजिक जनजागृती आणि कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थी सौ. रोहिणी भागवत मांदळे व वृक्षलागवड सारख्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ बेबीताई भिमाजी पोटे यांना वितरीत करण्यात आला. सदर दोनही पुरस्कार सौ. सुरेखा सोनवणे (सरपंच-नारायणगाव) सौ विजया वायकर, ग्रामसेविका, श्री. सिताराम मांदळे (उपसरपंच) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती श्री किरण मांदळे, श्री ज्ञानेश्वर मांदळे, श्री. रामदास कांदळकर, श्री. भाऊसाहेब कवात, श्री. माधवराव कवात, श्री कविश्वर मांदळे, श्री भिमाजी पोटे, श्री रमेश बसते, श्री अशोक कांदळकर, श्री नामदेव डुंबरे, श्री चेतन कांदळकर, श्री. सोपान मांदळे, श्री बाळासाहेब कांदळकर, संदीप दगु मांदळे, श्री दत्तू शिंदे, श्रावण मांदळे, कमलाकर सोनवणे, संतोष कांदळकर, प्रमोद मांदळे, सुकदेव शिंदे, गणेश नाकोडे, सौ. अर्चना पोटे व नारायणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

या पुरस्कार निवडीने तालुकाभारातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव मान्यवरांकडून केला जात आहे

लेखकाबद्दल

रावसाहेब जाधव

एक टिप्पणी द्या