[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सेतू महाईसेवा केंद्रातील शेतकरी, विद्यार्थ्यांची आर्थिक लुट थांबवा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

प्रहार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

चांदवड वार्ताहर – चांदवड तालुक्यातील सेतू व महाईसेवा केंद्राद्वारे विविध शासकीय दाखले काढण्यासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात आहे. हि आर्थिक लुट त्वरित थाबवून सर्वसामान्य शेतकरी, शालेय विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा चांदवड तालुका प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे कि, सध्या नवीन शैक्षणीक वर्ष सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात अडमिशन घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमोसाईल यासह इतर आवश्यक शासकीय दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू किंवा महाईसेवा केंद्रावर जावे लागते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे अनुदान बँक खात्यात जमा करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार लिंक करणे किंवा केवायसी करण्यासाठी सेतू किंवा महाईसेवा केंद्रावर जावे लागते. या ठिकाणी गेल्यावर शासनाने ठरवून दिलेल्या फी पेक्षा जास्त पैसे घेऊन त्याची पावती सबंधित शेतकरी किंवा विद्यार्थ्यांना देत नाही. पैसे देऊन हि तासनतास बसवून ठेवतात. यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची मानसीक व आर्थिक पिळवणूक सेतू व महाईसेवा केंद्र चालकाद्वारे होत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. पर्यायाने शेतकरी व विद्यार्थ्यांना एका शासकीय दाखल्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी किंवा विद्यार्थी यांची आर्थिक लुट थाबवून त्वरित मोफत शासकीय दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करावी, तसेच कार्यालयांमध्ये सुरु असलेला दलालांचे हस्तक्षेप त्वरित बंद व्हावा, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात दिर्घाई न करता वेळेत कामे करून द्यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर चांदवड तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, तालुका सल्लागार सुरेश उशीर, प्रविण जाधव, विनोद जाधव, चंद्रकांत जाधव, चेतन गांगुर्डे साहेबराव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या