चांदवड तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मान्यता मिळाल्याने 13 गावातील रिक्त पदे भरण्यासाठी 31 जुलै रोजी आरक्षण सोडत
चांदवड तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदापैकी ८० टक्के पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. चांदवड तालुक्यात कोतवाल संवर्गातील एकूण १६ पदे रिक्त असून त्या रिक्त पदापैकी शासन निर्णयान्वये ८० टक्के भरण्याचे निश्चित केलेले आहे. त्यानुसार चांदवड तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदापैकी १३ पदे भरण्यात येणार आहे. सदरची पदे भरताना तालुक्यात कोतवाल संवर्गाचे जे पद सर्वप्रथम रिक्त झालेले आहे त्या क्रमानुसार भरण्यात येणार आहे. तसेच मा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांचेकडील पत्रानुसार निश्चित करून दिलेल्या बिंदु नामावलीतील आरक्षणानुसार तालुक्यात खालील प्रमाणे आरक्षणा नुसार कोतवाल संवर्गातील रिक्त पदं भरावयची आहेत.
विजाअ ०१, इ.मा.व.०३ ईडब्ल्यूएस ०२ खुला १०
उपरोक्त नमुद शासन निर्णयात नमुद केल्यानुसार रिक्त पदाचे ८० टक्के पदे भरण्यासाठी दिलेली मान्यता व मा. विभागीय आयुक्त, कार्यालय नाशिक यांनी निश्चित करून दिलेल आरक्षणानुसार तालुक्यातील एकूण १६ रिक्त पदापैकी एकूण १३ पदे भरावयाची आहे. त्यानुसार जे पद प्रथम रिक्त झाले आहे त्या क्रमाने खालील प्रमाणे गावे निश्चित करण्यात आलेली असुन, आरक्षण जरी १६ पदाचे काढुन दिलेले असले तरी एकूण १३ पदे भरावयाची असल्याने खुल्या प्रवर्गातील आरक्षण कमी करण्यात आलेले आहे.
चांदवड तालुक्यात कोतवाल संवर्गातील पुढील प्रमाणे गांवातील पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.
जोपुळ, सोग्रस, हरणुल, शिवरे, शेलु, भयाळे, धोंडगव्हाण, तिसगांव, हिवरखेडे, वाकीखु., वाहेगांवसाळ, उसवाड, वडाळीभोई, या गावातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने, कोतवाल संवर्गातील रिक्त पदे असणा-या गांवातील नागरीकांना आव्हान करण्यात येते की, मा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी निश्चित करुन दिलेल्या आरक्षणा नुसार उपरोक्त रिक्त पदे असलेल्या गांवाना आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत पध्दतीचा वापर करुन सदरचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. तरी रिक्त असलेल्या गांवातील नागरीकांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय चांदवड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन चांदवड चे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.


नारायण खेडे वाहेगाव मधी जोडावे
नारायण खेडे वाहेगाव मधी जोडावे,