चांदवड बाजार समितीचे आवारावर कांदा लिलाव पुर्ववत सुरु :- संजय जाधव
चांदवड- मागील 11 ते 12 दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या संपामुळे बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते. त्यादृष्टीकोनातुन शेतकरी हितास प्राधान्य देऊन चांदवड बाजार समितीने वेळोवेळी व्यापारी व संचालक मंडळ यांच्या संयुक्तिक बैठका घेऊन कांदा लिलाव सुरु करणेकामी प्रयत्न केलेले आहे. त्याप्रमाणे आज दि.03/10/2023 रोजी सभापती संजय जाधव यांचे अध्यक्षतेखाली व्यापारी वर्गाची तातडीची बैठक घेऊन व्यापारी वर्ग व बाजार समितीचे सर्व घटकांना सोबत घेवून कामकाज करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली व बाजार समितीचे आवारावरील कांदा लिलाव सुरु करण्यात आले. त्याप्रमाणे बाजार समितीत एकुण 136 वाहनांची कांदा आवक होवून (2000 क्विंटल) बाजारभाव कमीत कमी 1670/- जास्तीत जास्त-2450 व सरासरी 2130/- याप्रमाणे बाजारभाव मिळाले.

लिलाव सुरु करतांना सभापती संजय जाधव, उपसभापती कारभारी आहेर, संचालक शिरिषकुमार कोतवाल, गणेश निंबाळकर, सुशिल पलोड, रविंद्र पवार, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, सर्व व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

