[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “जनआक्रोष मोर्चा” पुर्व नियोजन बैठक संपन्न.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “जनआक्रोष मोर्चा” पुर्व नियोजन बैठक संपन्न.

चांदवड दि २६/ चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड,यांचे मार्गदर्शनाखाली नवनियुक्त कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील यांचे अध्यक्षतेखाली तालुका अध्यक्ष श्री डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके दुष्काळ निवारणा उपाय योजना संदर्भातील शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मा आ. जयंतराव पाटील सो. याचे नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन दि. १/१२/२३ चे पुर्व नियोजन करने. तालुक्यातील विविध अडी अडचणी आढावा घेऊन त्यात उपाय योजना करने व इतर विषयावर आढावा घेण्यात आला. त्यात तालुका अध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड,पक्षाचे पदाधिकारी श्री दत्तात्रय वाघचौरे टोपे सर, श्री विजयराव जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केली. बैठकीस. श्री अरुण काका न्याहारकर, विजयराव जाधव, सुखदेव जाधव,शहाजी पाटील, अमोल भालेराव, प्रकाश शेळके, नवनाथ आहेर, निवृती घाटे, सुभाष शिदे, विजय गांगुर्डे, डॉ. श्यामराव जाधव म्हसु, गागरे, शैलेश ठाकरे दर्शन घुले चेतन देशमानेडॉ.दिलीप शिंदे,रामभाउ शिंदे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या