राष्ट्रीय पक्षी मोराला कातरवाडी येथे जीवदान
कातरवाडी येथील रामदास बापु झाल्टे यांच्या विहिरीत मोर पडला ही माहिती समाजसेवक भागवत झाल्टे यांना दिली झाल्टे यांनी तत्काल ही माहिती वनरक्षक सोनाली वाघ यांना देऊन त्यांनी आपले कर्मचारी अंकुश गुंजाळ व भाऊसाहेब झाल्टे यांना पाचारण करण्यात आले सर्वांनी जाळी दोरीच्या साह्याने प्रयत्न करूनही मोर जाळी मध्ये येत नव्हता त्यावेळी भागवत झाल्टे यांनी स्वतच विहिरीत उतरून मोराला सुरक्षित बाहेर काढत असतानां त्यावेळी मोराने अक्षरशःभागवत झाल्टे यांना पायाच्या नखांनी उजव्या हाताला जखमी केले हातातून रक्त बाहेर येत होते तरीही धाडसी वृत्ती असल्यामुळे मुक्या प्राण्यांना जीवदान मिळाले अनेक ठिकाणी मोर हरण कोल्हा कुत्रा बिबट्या यासारखे जंगली प्राण्यांना बाहेर काढण्यात झाल्टे यांचे नेहमीच मोठे योगदान असते विहीरतुन बाहेर काढून मोराला कोरडे केले व त्याला आपल्या परिसरातील जंगलात सुरक्षित सोडून देण्यात आले त्यावेळेस मुक्या प्राण्यांना पाण्या अभावी भटकंती करावी लागते त्यामुळे फॉरेस्ट विभागाने वन्य प्राण्यांच्या पिण्याची पाण्याची सोय होईल प्रशासनास सुचित करावे अशी भावना समाजसेवक भागवत झाल्टे यांनी व्यक्त केली
सदर ठिकाणी संतोष झाल्टे, दत्तू झाल्टे, गोकुळ झाल्टे, वैभव झाल्टे, शुभम झाल्टे, अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे, माजी सरपंच रामदास बापु झाल्टे, समाधान झाल्टे,जनार्दन झाल्टे ,सखाहरी पगार उपस्थित होते

